एटीएम कार्ड बदलून 68 हजारांचा गंडा

By Admin | Published: April 28, 2017 01:13 AM2017-04-28T01:13:54+5:302017-04-28T01:13:54+5:30

धुळे : एटीएम कार्ड बदलून एकाच्या बँक खात्यातून 68 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना देवपुरातील दत्त मंदिर चौकात घडली आह़े

Change of ATM card to 68 thousand people | एटीएम कार्ड बदलून 68 हजारांचा गंडा

एटीएम कार्ड बदलून 68 हजारांचा गंडा

googlenewsNext

धुळे : एटीएम कार्ड बदलून एकाच्या बँक खात्यातून 68 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना देवपुरातील दत्त मंदिर चौकात घडली आह़े याप्रकरणी देवपूर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध  गुन्हा दाखल झाला आह़े
 देवपुरातील नकाणे रोडवरील मधुमंदार सोसायटीत राहणारे रतन दला अहिरे (वय 59, रा. नकाणे रोड, देवपूर) हे गेल्या गुरुवारी दत्त मंदिर चौकातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होत़े  त्यांना पैसे काढता येत नसल्यामुळे त्यांनी जवळ उभ्या अज्ञात व्यक्तीला  कार्ड दिल़े त्याने अहिरे यांना 2 हजार रुपये काढून दिल़े  कार्ड देताना मात्र त्यांना दुसरेच कार्ड दिल़े
घरी आल्यावर आपले कार्ड बदली झाल्याचे व खात्यातून कोणीतरी पैसे काढल्याचे रतन अहिरे यांच्या लक्षात आल़े
मात्र अज्ञात व्यक्तीने त्यांच्या एटीएम कार्डद्वारे त्यांच्या बँक खात्यातून त्याच  एटीएममधून तीन ते चार वेळा एकूण 68 हजार 69 रुपये काढून घेतले.
त्यानंतर त्यांनी बँकेला माहिती दिली़ तसेच देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़  त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ. एस़ बी़ चिंचोलीकर करीत आहेत़

Web Title: Change of ATM card to 68 thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.