‘शिवशाही’साठी ‘परिवर्तन’च्या फेºया कमी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:01 PM2018-03-05T12:01:07+5:302018-03-05T12:01:07+5:30
धुळे विभाग : प्रवाशांच्या सुविधेसाठी लवकरच धुळे-नाशिक मार्गावर वातानुकूलित ‘शिवशाही’ बस सुरू होणार
अतुल जोशी ।
आॅनलाईन लोकमत
धुळे : महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) सुरू केलेली ‘शिवशाही’ बससेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. आता धुळे-नाशिक मार्गावर विनावाहक वातानुकूलित ‘शिवशाही’ बस सुरू करण्यात येणार आहे. मात्र हे करत असताना धुळे-नाशिक या विनावाहक ‘परिवर्तन’ बसच्या फेºयांची संख्या थोडी कमी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खासगी बससेवेला स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गावर अत्याधुनिक अशी ‘शिवशाही’ बससेवा सुरू केली. वातानुकूलित बस, आकर्षक डिजिटल बोर्ड, पुशबॅक आरामदायी सीट, टू बाय टू आसन व्यवस्था, मोबाइल चार्जर, अशी या बसची वैशिट्ये आहेत. या बसची आसनक्षमता ४३ आहे.
सर्वप्रथम मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गावर या बसेस सुरू झाल्या. तेथे प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर धुळे आगारातर्फेही धुळे-पुणे, धुळे-मुंबई या मार्गावर ‘शिवशाही’ बस सुरू करण्यात आली आहे.
धुळे-नाशिक शिवशाही बससेवा
प्रवाशांचा वाढता प्रतिसाद व उन्हाळ्यात वातानुकूलित बसची गरज लक्षात घेऊन, एसटी महामंडळाने आता धुळे-नाशिक या मार्गावर विनावाहक ‘शिवशाही’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.५ मार्चनंतर ही बससेवा सुरू होऊ शकते असे सांगण्यात आले. सकाळी ६ वाजता धुळे आगारातून पहिली बस सुटणार आहे. त्याचवेळेला नाशिकहूनही धुळ्यासाठी ही बस सुटेल. सायंकाळी ७.४५ वाजता दोन्ही दिशेने शेवटची शिवशाही बस सुटेल. धुळे आगाराच्या १० व नाशिक आगाराच्या १० अशा दिवसभरात २० फेºया होणार आहेत. ही बस मालेगाव बायपासने जाईल. धुळ्याहून सुटलेली बस साधारणत: अडीच तासात नाशिकला पोहचणे अपेक्षित आहे. तेवढाच वेळ नाशिकहून धुळ्याला पोहचण्यासाठी लागणार आहे.यासाठी मोठ्या नागरिकांना २६४ रुपये तर लहान मुलांना १३७ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. या बसमध्ये अर्धे तिकिटाची सुविधा नाही. त्यामुळे ज्येष्ठांनाही प्रवास करायचा असल्यास तो पूर्ण तिकीट काढूनच करावा लागणार आहे.
मुंबई-पुणे मार्गावर स्लीपर कोच
सध्या मुंबई-पुणे मार्गावर धावणाºया खासगी बसेस या स्लीपर कोच आहेत. त्यामुळे प्रवाशांचा त्या बसने प्रवास करण्याकडे जास्त कल आहे. खासगी बसच्या धर्तीवरच आता धुळे आगारातून मुंबई, पुणेसाठी ‘शिवशाही’ बसची स्लीपर कोचची सेवाही लवकरच सुरू होणार आहे. तसेच धुळ्याप्रमाणे विभागातील इतर आगारांनाही ‘शिवशाही’ बस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
प्रवाशांनी लाभ घ्यावा : देवरे
प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक, वातानुकूलित धुळे-नाशिक शिवशाही बससेवा सुरू करण्यात येत असून, त्याचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी केले आहे.