वीज मीटरमध्ये फेरफार, सव्वादोन लाखात वितरण कंपनीची फसवणूक
By admin | Published: July 17, 2017 01:11 AM2017-07-17T01:11:50+5:302017-07-17T01:11:50+5:30
धुळे : वीज मीटर रीडिंगमध्ये फेरफार करून प्रत्यक्षात कमी बिल आकारून वीज वितरण कंपनीची सव्वादोन लाखात फसवणूक केल्याचा प्रकार धुळे तालुक्यातील लोहगड आणि लोणखेडी येथे उघडकीस आलेला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वीज मीटर रीडिंगमध्ये फेरफार करून प्रत्यक्षात कमी बिल आकारून वीज वितरण कंपनीची सव्वादोन लाखात फसवणूक केल्याचा प्रकार धुळे तालुक्यातील लोहगड आणि लोणखेडी येथे उघडकीस आलेला आहे़ याप्रकरणी संशयित एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
धुळे ग्रामीणचे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सतीश सोनालाल महाजन (४६) रा़ संत गाडगेबाबा कॉलनी, देवपूर धुळे यांनी फिर्याद दाखल केलेली आहे़ सिद्धांत एंटरप्रायझेस, उत्कर्ष बंगला, जयहिंद कॉलनी, देवपूर धुळे यांनी मीटर रीडिंगसाठी नेमलेल्या विठ्ठल लक्ष्मण पाटील (रा़ गरताड ता़ धुळे) याने २५ ते २९ जून २०१७ या कालावधीत धुळे तालुक्यातील लोहगड, लोणखेडी येथील एका वीज ग्राहकाचे मीटर रीडिंग घेतले़ प्रत्यक्षात असलेल्या मीटर रीडिंगपेक्षा कमी युनिटची नोंद करून वीज मंडळाकडे कमी रीडिंग दाखविले़ २१ हजार ४३४ इतके युनिट कमी दाखवून वीज मंडळाचे २ लाख १४ हजार ३७० रुपयांचे वीज मंडळाचे नुकसान करून फसवणूक करण्यात आली़ हा प्रकार उघडकीस आल्याने सतीश महाजन यांनी धुळे तालुका पोलिसात फिर्याद दिली़ यावरून संशयित विठ्ठल पाटील याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ पुढील तपास सुरूआहे़
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यामुळे चुकीच्या कामाला आळा बसण्यास मदत मिळणार आहे़