चिकसे-जिरापूरचे सरपंच कल्पना सोनवणे यांना वीज व्यवस्थापन पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 05:12 PM2019-02-22T17:12:39+5:302019-02-22T17:13:05+5:30
वॉटर हीटर हे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत असलेले गाव
साक्री तालुक्यातील चिकसे-जिरापूर गाव संपूर्ण हगणदारी मुक्त झाले असून त्या बद्दल नाशिक येथील सरपंच परिषदेत ग्रामपंचायतीला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. गावाच्या विजेच्या समस्या दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याची दखलही घेण्यात आली. नावीन्यपूर्ण प्रकल्प म्हणून वॉटर हीटर हे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत असलेल्या सौर ऊर्जेवर कार्यान्वीत करण्यात आले आहे. तसेच वीज जोडणी घेण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येते. या शिवाय गावातील पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक बिघाडावर जलद उपाययोजना करता याव्या म्हणून ग्रामविद्युत व्यवस्थापक पद भरून स्थानिक व्यक्तीस रोजगार मिळवून दिला. यामुळे गावाला सुरळीत वीज पुरवठा होत असल्याने ग्रामस्थ सुखी, समाधानी आहेत.