मुख्यमंत्र्यांनी टोचले नगरसेवकांचे कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:01 PM2018-12-11T22:01:11+5:302018-12-11T22:01:53+5:30

मुंबईत विजयोत्सव : विकास न केल्यास मनपा बरखास्त करू

Chief Minister held ears of Tokel corporators | मुख्यमंत्र्यांनी टोचले नगरसेवकांचे कान

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणूकीत जनतेने भाजपला विजयाचा कौल दिला़ त्यामुळे जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठीस सर्व नगरसेवकांनी विकासावर भर द्यावा़ कामे होत नसल्याच्या तक्रारी आल्या तर मनपा बरखास्त करायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त नगरसेवकांचे कान टोचले़
मनपा निवडणूकीत भाजपने ५० जागा मिळवत प्रथमच स्पष्ट बहूमत मिळवले़ या ऐतिहासिक विजयानंतर सर्व नवनियुक्त नगरसेवकांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, महानगरप्रमुख अनुप अग्रवाल उपस्थित होते़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त नगरसेवकांशी संवाद साधला़ ते म्हणाले की, आतापर्यंत अनेक नगरसेवक अनेकदा निवडून आले परंतु त्यांनी शहराचा कधीच विचार केला नाही, त्यामुळे शहर विकासात बरेच मागे राहिले़ परंतु आता विकासाची संधी सर्व सदस्यांना भाजपच्या माध्यमातून मिळाली आहे़ पण यापूर्वी चालले तसे पुढे चालणार नाही, तर प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाचा विकास हा एकमेव अजेंडा ठेवावा लागेल़ शहर विकासात निधी कमी पडू देणार नाही़ पण निधी जर वाया गेला व तक्रारी आल्या तर प्रसंगी महापालिका बरखास्त करायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला़ शहर हद्दवाढीमुळे नगरसेवकांची जबाबदारी वाढली असुन शहरातील कोणताच भाग अविकसित राहणार नाही, याकडे लक्ष ठेवावे़ कोणीही गुंडगिरीला थारा देऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या व सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले़ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नवनियुक्त नगरसेवकांचे अभिनंदन केले़ मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाºयाची नंतर नगरसेवकांमध्ये चर्चा होती़ 
पहिल्या आठवड्यात १०० कोटी़़़
शहर विकासासाठी पहिल्याच आठवड्यात १०० कोटी रूपयांचा निधी देणार आहे़ शहरातील सर्व प्राथमिक सुविधांचे प्रश्न त्यातून सोडविण्यात यावेत़ त्याचप्रमाणे शहराला पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून त्यासाठी प्रस्तावित योजनेसाठी आवश्यक निधी तातडीने देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले़ 

Web Title: Chief Minister held ears of Tokel corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे