व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:15 PM2020-07-19T22:15:12+5:302020-07-19T22:15:58+5:30

कोरोनासह स्थानिक समस्यांवर चर्चा : हिलाल माळी यांची माहिती

The Chief Minister interacted with the district chief through video conference | व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांशी संवाद

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांशी संवाद

Next

धुळे : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख आणि मंत्री यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे रविवारी संवाद साधला़ त्यात कोरोनाची स्थिती आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली़ मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची परिस्थिती जाणून घेतली अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी दिली़ जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न यानिमित्ताने मांडता आले, असेही माळी म्हणाले़
हिलाल माळी यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोना संदर्भात सर्वप्रथम माहिती दिली़ कोरोनाने शहरातून ग्रामीण भागाकडे लक्षवेधी शिरकाव केला आहे़ कोरोनाचा मृत्यूदर आणि बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी देखील लक्षात आणून दिली़ जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करुन एकमेव सिद्धेश्वर हॉस्पिटल हे सध्या कोरोना रुग्णांसाठी सुरू केले आहे़ याच प्रमाणे महात्मा फुले जीवनदायी योजनेशी संलग्न असलेली आणि इतर मोठी रुग्णालये देखील उपलब्ध झाली पाहिजे असे निदर्शनास आणून दिले. खरिपाच्या हंगामात पेरणी पूर्ण झाल्यामुळे शेतकरी बांधवांशी खतांची अडचण निर्माण झाली आहे़ त्यात प्रामुख्याने युरिया या रासायनिक खतांची तूट निर्माण झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या तक्रारी वाढल्या आहेत. बऱ्यापैकी युरियाचा प्रश्न सर्वच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केल्याने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या प्रश्नावर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कृषिमंत्री दादा भुसे यांना याबाबत बोलण्यास सांगितले़ त्यावर कृषिमंत्र्यांनी युरियाचा प्रश्न लवकरात लवकर तीन ते चार दिवसात निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. जिल्ह्यात अवैध दारुचा मोठ्या प्रमाणावर येत असून गुंडगिरी वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले़
यानंतर ग्रामीण भागात पक्षभेद विसरुन कोरोना दक्षता समित्या स्थापन कराव्यात़ सुरक्षित राहून इतरांची काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी केले़
वाढीव विजबिले रद्द करण्याची मागणी
धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना महावितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीज बिले ही रिडींग न घेता आकारणी केली़ परिणामी वीज बिले वाढवून दिली आहे़ वाढवून दिलेले वीज बिले महावितरण कंपनीला रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माळी यांनी यावेळी केली़

Web Title: The Chief Minister interacted with the district chief through video conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे