मुलांनी भूलथापांना बळी पडू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 10:15 PM2019-12-04T22:15:32+5:302019-12-04T22:16:04+5:30
शरद पवार : मनपा उर्दू शाळेत बालहक्क सुरक्षा विषयावर कार्यक्रमात प्रतिपादन
धुळे : शाळकरी विद्यार्थ्यांवर चॉकलेट देण्याच्या बहाण्यातून गैरकृत्य केले जाते़ त्यांच्या मनात पोलिसांविषयी भिती असल्याने ते घडलेला प्रकार सांगत नाही़ अशा घटना थांबविण्यासाठी शाळा, महाविद्यालयात ‘पोलिस दादा आणि पोलिस दीदी’ हा उपक्रम शाळा, महाविद्यालयात राबविण्यात येत आहे, अशी माहिती राज्य शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष शरद पवार यांनी दिली़
साक्रीरोडवरील मनपा उर्दू शाळा क्र. २६ मध्ये बालहक्क सुरक्षा विषयी कार्यक्रम घेण्यात आला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बालमुकुंद दुसाने, हेड कॉस्टेबल वंदना वाघ, पोलीस नाईक नईम शेख आदी उपस्थित होते़ यावेळी वंदना वाघ म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना फुस लावून गैरकृत्य घडतात़ घडलेला प्रकार मुलं आई-वडिलांना सांगू शकत नाही आणि पोलिसांविषयी त्यांच्या मनात भिती असते़ त्यामुळे ते अत्याचारास बळी पडतात़ शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार, बालहक्क कायद्याविषयी माहिती तसेच मुलींची छेडखानी, पाठलाग करणे किंवा हावभाव करणाऱ्यांवर कायद्याचा धाक बसावा यासाठी १०९१ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे़ या क्रमांकावर महिला किंवा मुली तक्रार दाखल करू शकतात, अशी माहिती वाघ यांनी दिलीक़ार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजिज शेख, ऐजाज पठाण, हर्षदा गिरणे, ज्योती फुलपगारे, संजिवनी पाटील, स्वाती फुलपगारे, मुख्याध्यापिका फरीहीन शेख, रचना बनसोडे, विजय देवरे आदींनी परीश्रम घेतले़ सूत्रसंचालन दीपक निकम यांनी तर आभार सीमा महाले यांनी मानले़