चिमठाणे, दलवाडे, पिंपरी गावे प्रतीबंधीत क्षेत्र घोषीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 09:26 PM2020-05-07T21:26:18+5:302020-05-07T21:26:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिमठाणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे राहत असल्येल्या ५५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने चिमठाणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमठाणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे राहत असल्येल्या ५५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने चिमठाणे गावात भीतीचे वातावरण आहे़ गावात कुणीही बाहेर निघत नसल्याने स्मशान शांतता आहे़
बाधित महिलेच्या संपर्कात अनेक व्यक्ती आल्याचे देखील उघड झाले आहे़ चिमठाणे, दलवाडे, पिंपरी गावांचा परिसर सील करण्यात आला आहे़ तसेच चिमठाणे येथील आशा वर्कर व मदतीस यांनी सर्वेक्षण सुरु केले आहे़ चिमठाणे परिसरातील नागरिकांची विचारपूस करून नावनोंदणी केली जात आहे़
नागरीकांनी देखील लॉकडाउनचे तंतोतंत पालन करुन प्रशासनाला सहकार्य केले आहे़ गुरुवारी दुपारी पोलीस प्रशासनाने ध्वनीक्षेपकावरुन गावकऱ्यांना विविध सूचना दिल्या़ चौफुलीपासून ते गावात बंदबोस्त आहे़ अत्यावश्यक सेवा देखील बंद करण्यात आल्या आहेत़ शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक दुर्गेश तिवारी व चिमठाणे येथील पोलीस मनोज ठाकरे, तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे़
कोरोना बाधित महिला राहत असलेला महिलेचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. पोलिसांनी दिवसा आणि रात्रीचीही गस्त वाढवली आहे़