चिंचवार येथे मारहाणीनंतर मुलीची आत्महत्या, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:10 PM2017-12-07T12:10:24+5:302017-12-07T12:11:22+5:30

संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, काहीवेळ निर्माण झाला तणाव

In Chinchwar, the girl committed suicide after the assault, the body refused to take possession of the body | चिंचवार येथे मारहाणीनंतर मुलीची आत्महत्या, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

चिंचवार येथे मारहाणीनंतर मुलीची आत्महत्या, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

Next
ठळक मुद्देमहिलांनी मारहाण केल्याने मुलीने आत्महत्या केल्याचा आरोपसंबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीपोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील चिंंचवार येथे १४ वर्षीय मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला असून गावातील महिलांनी मारहाण केल्यामुळेच तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला. संबंधितांवर गुन्हे दाखल केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
मात्र चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन सोनगीर पोलिसांनी दिले. त्यामुळे सुमारे ४८ तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 
ज्योती निंबा पाटील (१४) रा.चिंचवार असे मृत मुलीचे नाव असून तिचा मृतदेह मंगळवारी दुपारी तिच्याच शेतातील विहिरीत आढळला होता. त्या प्रकरणी सोनगीर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 
ज्योतीचा मृत्यू अकस्मात नसून तिने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दोन दिवसापूर्वी ज्योती व गावातील मुलींचे भांडण झाले होते. त्यातून काही महिलांनी ज्योतीला मारहाण केली. त्यांच्या तावडीतून आईने ज्योतीची सोडवणूक केली. मात्र भेदरलेल्या ज्योतीने शेतात जाऊन तेथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 
मृतदेह घेतला ताब्यात 
त्यामुळे जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका धनगर समाजाचे नेते अण्णा सूर्यवंशी आणि नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र सोनगीर पोलिसांनी चौकशीअंती दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन ज्योतीच्या नातेवाईकांना  दिले. त्यामुळे ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेऊन दुपारी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: In Chinchwar, the girl committed suicide after the assault, the body refused to take possession of the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.