चिकसेत उद्या हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 09:32 PM2019-05-29T21:32:32+5:302019-05-29T21:33:03+5:30
शोभायात्रा उत्साहात : गुरुवारी होमहवन, पूजेसह विविध कार्यक्रम
पिंपळनेर : येथे लोकवर्गणीतून बांधलेल्या मंदिरात हनुमान मुर्तीची प्राणप्रतिष्ठा शुक्रवार ३१ रोजी करण्यात येणार आहे. यानिमित्त बुधवारी मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. गुरुवार ३० रोजी होमहवनासह पूजा करण्यात येणार येणार आहे.
सात फुट उंचीची व सुमारे ६५१ किलो वजनी पवनपुत्राच्या मुर्तीची बुधवारी संपुर्ण गावातून सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने अबालवृद्धांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या.
मिरवणुकी दरम्यान नविन मुर्तीची महिलांकडून आरती करण्यात आली. यावेळी प्रत्येक घरातून भंडाºयासाठी तांदूळ दान देण्यात आला. गावातून जमा झालेल्या तांदळाने हनुमानाची मुर्ती एका कंडीत झाकण्यात येईल. मिरवणुकीअंती साधारणत: आठ क्विंटल तांदुळ जमा झाला.
साक्री तालुक्यातील चिकसे येथिल अनेक वषार्पासून संकल्पित असलेले श्री हनुमान मंदिर अखेर साकार झाले. शेकडो वर्ष जुन्या मारूती मंदिराचा जिर्णोद्धार करून त्याच ठिकाणी नविन मंदिर बांधण्यात आले. मंदिर उभारणीसाठी चिकसे ग्रामस्थांनी गाव वर्गणीतून तब्बल १५ लाख रुपये जमवले.
गुरुवार ३० रोजी मंदिराच्या प्रांगणात १५ जोडप्यांकडून होम हवनासह पुजा केली जाणार आहे. शास्त्रोक्त मंत्रोच्चार महंत मकरंदबुवा वैद्य हे करत असून त्यांच्या साथीला बाहेर गावाहून आलेले पुजारी पुजा सांगतील.
नविन मुर्तीर्ची प्राणप्रतिष्ठा उद्या शुक्रवार ३१ रोजी सकाळी नऊ वाजेपासून सुरू होणार आहे. नंतर कळस चढविण्याचा कार्यक्रम होईल. महाप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजेपासून सुरू होईल. बुधवारी रात्री ह.भ.प. विजय महाराज काळे पिंपळनेरकर यांच्या किर्तनानंतर गुरुवारी रात्री नऊ वाजता ह.भ.प. जयराम बाबा गोंडेगावकर यांचे किर्तन होणार आहे. कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चिकसे ग्रामस्थांनी केले आहे.