पुरग्रस्तांसाठी नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:51 AM2019-08-14T11:51:47+5:302019-08-14T11:52:02+5:30

उपक्रम : कापडण्यात सलग ४ दिवस मदतफेरी, निजामपूरच्या मुस्लिम बांधवांनी दिला २० हजाराचा मदत निधी

Citizens' help for the afflicted has begun | पुरग्रस्तांसाठी नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरुच

कापडणे येथे पुरग्रस्तांच्या मदतफेरीप्रसंगी पदाधिकारी व ग्रामस्थ

Next

निजामपूर/कापडणे : कोल्हापूर आणि सांगली परिसरात पुराने थैमान घातले आहे. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील कापडणे येथे १२ ते १५ तारखेदरम्यान मदतफेरी काढली जात आहे. दरम्यान, निजामपूर जैताणे येथील मुस्लिम बांधवांनी पुरग्रस्तांसाठी २० हजाराचा निधी जमा करुन मंगळवारी तहसीलदारांकडे सुपूर्द केला.
कापडणे येथे १२ रोजी ऐतिहासिक गाव दरवाजापासून मदतफेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना पुरग्रस्तांना मदतीचे आवाहन करण्यात आले. ग्रामस्थांनी अन्नधान्य, खाद्य पदार्थासह रोख रक्कमेची  मदत केली. 
यावेळी १६ हजार रुपयांची रक्कम जमा झाली.  ही मदतफेरी १५ तारखेपर्यंत सलग सुरू राहणार आहे. मदतफेरीतून जमा होणारी रक्कम, खाद्यपदार्थ, कपडे आदींचे येथील पदाधिकारी, तरुण, ग्रामस्थ पूरग्रस्तांना वाटप करायला जाणार आहेत व तेथे स्वच्छता मोहीमही राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पदाधिकाºयांच्यावतीने देण्यात  आली.
मदतफेरीत सरपंच जया  प्रमोद पाटील, माजी उपसरपंच कविता मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गुलाबराव पाटील, माजी सरपंच  भटू पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र माळी, संतोष एडाईत, उद्योजक अरुण पुंडलिक पाटील, संजय युवराज पाटील, रामकृष्ण पाटील, जगन्नाथ पाटील, जिजाबराव माळी, विठोबा माळी, चेतन पाटील, संभाजी पाटील, भागवत पाटील, महेश पाटील, श्याम पाटील, विश्वास आत्माराम देसले, चंद्रकांत पाटील, मनोज छबिलाल पाटील, मनोज मुरलीधर पाटील, महेश बोरसे, योगेश अत्रे, ललित  बोरसे, दीपक काटे, महेश अरून पाटील, प्रवीण पाटील, योगेश खलाणे, भैया बोरसे, चुडामण पाटील, विशाल शिंदे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Web Title: Citizens' help for the afflicted has begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे