नागरिकांनी काढले स्वत:हून ‘अतिक्रमण’!

By admin | Published: January 28, 2017 12:16 AM2017-01-28T00:16:25+5:302017-01-28T00:16:25+5:30

वडजाई रोडवर अतिक्रमण काढण्यासाठी शुक्रवारी जेसीबी गेले होत़े पण नागरिकांनी विरोध न करता स्वत:हून अतिक्रमण काढणे पसंत केल़े

Citizens removed 'encroachment' by themselves! | नागरिकांनी काढले स्वत:हून ‘अतिक्रमण’!

नागरिकांनी काढले स्वत:हून ‘अतिक्रमण’!

Next

धुळे : शहरातील वडजाई रोडवर अतिक्रमण काढण्यासाठी शुक्रवारी जेसीबी गेले होत़े पण नागरिकांनी विरोध न करता स्वत:हून अतिक्रमण काढणे पसंत केल़े त्यामुळे या भागात शांतता होती़ सायंकाळी उशिरार्पयत अतिक्रमण काढून घेण्याचे काम सुरू होते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष सूर्यवंशी यांनी दिली़
शहरातील वडजाई रोडवरील 60 फुटी रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण निमरूलन पथकाने शुक्रवारी सर्वात मोठी कारवाई केली आह़े सुमारे 200 निवासी आणि 100 व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात यापूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या़ त्यासाठी त्यांना मुदतदेखील देण्यात आली़ पण मुदतीत हे अतिक्रमण न काढल्यामुळे जेसीबी मशीन वडजाई रोडवर नेण्यात आल़े अतिक्रमण काढताना नुकसान होऊ नये यासाठी या भागातील नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात प्रशासनाकडे विनंती केली़ त्यामुळे जेसीबीने अतिक्रमण काढण्यात आले नाही़ नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे काम केल़े या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष सूर्यवंशी, शाखा अभियंता झाल्टे, एस़ डी़ साबळे, क़े एम़ पाटील, सहायक अभियंता राहुल पाटील, महापालिकेचे नंदू बैसाणे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होत़े

Web Title: Citizens removed 'encroachment' by themselves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.