शहर हद्दवाढीत ११ गावांचा समावेश?
By admin | Published: May 25, 2017 12:55 AM2017-05-25T00:55:37+5:302017-05-25T00:55:37+5:30
धुळे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेली महापालिकेची हद्दवाढ येत्या काही दिवसात लागू होण्याची शक्यता आहे़
धुळे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेली महापालिकेची हद्दवाढ येत्या काही दिवसात लागू होण्याची शक्यता आहे़ मनपाकडून त्यासंदर्भात माहिती मागविण्यात आली होती़ हद्दवाढीत ११ गावांचा समावेश करण्यात आल्याचे मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी सांगितले.
शहर हद्दवाढीचा अंतिम प्रस्ताव या वर्षाच्या सुरुवातीला शासनाला सादर करण्यात आला होता़ त्यानंतर हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला होता. मात्र गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौºयानंतर या विषयाने पुन्हा वेग घेतला आहे. राज्य शासनाने महापालिकेकडून शहर हद्दवाढीची माहिती मागविली आहे. महापालिकेने हद्दवाढीत प्रस्तावित करण्यात आलेल्या गावांची नावे, समाविष्ट करण्यात आलेले क्षेत्र, नकाशे, सातबारा उतारे व आनुषंगिक माहिती शासनाला सादर केली आहे़ शासन या माहितीच्या आधारे हद्दवाढीसंदर्भात लवकरच अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे. हद्दवाढ झाल्यास धुळे मनपावर १ लाखापेक्षा अधिक लोकसंख्येचा भार पडणार आहे़