सुसंस्कृत नागरिकत्वासाठी धर्मनिरपेक्ष संस्कार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:07 PM2019-04-20T22:07:03+5:302019-04-20T22:09:18+5:30

रवींद्र निकम। राष्टÑ सेवा दलाच्या बालसंस्कार शिबिरात प्रतिपादन 

For the civilized citizenship, secular sanskars require | सुसंस्कृत नागरिकत्वासाठी धर्मनिरपेक्ष संस्कार आवश्यक

dhule

Next
ठळक मुद्देdhule


धुळे :  कष्ट व चिकाटीसोबत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रगतीशील व सुसंस्कृत नागरिक तयार व्हावेत म्हणून राष्टÑ सेवा दलाच्या धर्मनिरपेक्ष संस्कारांची गरज आहे. आणि त्यासाठी बालसंस्कार शिबिर आवश्यक आहे, असे प्रतिपादन निकम पॉलिटेक्निक  संस्थेचे चेअरमन प्रा.रवींद्र निकम यांनी राष्टÑ सेवा दल आयोजित बालसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी केले. 
या प्रसंगी मातृसेवा संघाचे चेअरमन प्रदीप शाह, जगदीश देवपूरकर, माजी राष्टÑीय अध्यक्ष प्रा.अरविंद कपोले, महानगर अध्यक्ष नितीन माने, शिबिर प्रमुख रमेश पवार आदी उपस्थित होते.
या शिबिरात वीणा नांदेडकर, कमलाकर देसले, प्रा.कपोले, प्रा.भामरे, जादूगार पाकळे, प्रा.साळुंके, रमेश दाणे, जगदीश देवपूरकर, एस. आर. वाणी आदी मार्गदर्शक व तज्ञांनी हास्यजत्रा, विविध गाणी, गोष्टी, शुद्ध लेखन, समूह गायन व बौद्धिकाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
 पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक सदाभाऊ मगदूम, धीरज जाधव यांनी लेझीम, टिपणी, बर्ची, अ‍ॅरोबिक्स आदी मैदानी खेळांचे प्रशिक्षणदिले. शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र, रोख पारितोषिकांनी गौरविण्यात आले. सूत्रसंचलन अ‍ॅड.मिलिंद बोरसे व आभार रमेश सावंत यांनी मानले. 

Web Title: For the civilized citizenship, secular sanskars require

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे