नेर संरपंच शंकरराव खलाणे यांना स्वच्छता पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 06:02 PM2019-02-22T18:02:31+5:302019-02-22T18:02:46+5:30
पाणी, वीज, रस्ते, गटारी या सुविधांची कामे प्राधान्याने हाती घेतली
धुळे तालुक्यातील नेर गावाची लोकसंख्या सुमारे ३० हजार एवढी आहे. ग्रा.पं.तर्फे पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, गटारी या सुविधांची कामे प्राधान्याने हाती घेतली आहेत. पाणीपुरवठ्याच्या विहिरींवर क्षार विघटन यंत्रे बसविली असून प्रत्येक खांबावर एलईडी बल्ब बसविण्यात आले. गावात स्वच्छतेसाठी कचरा संकलनासाठी घंटागाडी खरेदी केली असून त्याद्वारे प्रत्येक गल्ली, वस्तीमध्ये जाऊन कचरा संकलन केले जाते. त्यामुळे संपूर्ण गावात स्वच्छता राहते. साथीचे रोग उदभवत नाही तसेच त्यांचा फैलावही होत नाही. ग्रा.पं.ने गावात हगणदरी मुक्तीवरही भर दिला असून जनजागृती घडवून गावातील जास्तीत जास्त लोकांना वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा वापर करावा, असे आवाहन केले. त्यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहे. स्वच्छतेवर आरोग्य अवलंबून असते, याबाबतही जनजागृती केली जाते. त्यास ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुरस्कार सोहळ्याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़सुभाष भामरे यांच्या हस्ते संरपच शंकरराव खलाणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता़