धुळे जिल्हा परिषदेत अधिकारी, पदाधिकाºयांनी राबविली स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:37 PM2018-09-19T16:37:56+5:302018-09-19T16:39:27+5:30
दोन तासात परिसर केला चकाचक, कर्मचाºयांना दिली स्वच्छतेची शपथ
आॅनलाइन लोकमत
धुळे- स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत आज जिल्हा परिषदेत अधिकारी व पदाधिकाºयांनी संयुक्तपणे दोन तास स्वच्छता मोहीम राबविली. यात जिल्हा परिषदेचा परिसर व कार्यालयात स्वछता करण्यात आली.
सकाळी सव्वा अकरा वाजता या स्वच्छता मोहीमेला सुरवात झाली. सुरवातीच्या एका तासात अधिकारी व पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या आवारात स्वच्छता केली. त्यानंतर कर्मचाºयांनी कार्यालयात ही मोहीम राबविली. या दोन तासाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला. या मोहीमेत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती मधुकर गर्दे, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.के. वाघ, गटविकास अधिकारी अभिजीत घोरपडे, यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी उपस्थित कर्मचाºयांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.