विद्यार्थ्यांना जुंपले स्वच्छतेच्या कामास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:41 PM2019-01-04T22:41:49+5:302019-01-04T22:42:16+5:30

सुकापूर आश्रमशाळेतील प्रकार : पालक, ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक; पदाधिकाऱ्यांना कोंडले

Cleanliness of the students | विद्यार्थ्यांना जुंपले स्वच्छतेच्या कामास

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री तालुक्यातील सुकापुर येथील शासकीय आश्रमशाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून सुरक्षा व स्वच्छतेची काम करवून घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शुक्रवारी आदिवासी बचाव अभियान संघटना पदाधिकाºयांसह संतप्त पालक व ग्रामस्थांनी अधिकाºयांच्या दालनास कुलूप ठोकत त्यांना कोंडून ठेवले. संध्याकाळी उशीरा साक्री तहसीलदारांनी त्यांना आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावा यासाठी शासनाकडून विविध शैक्षणिक सवलती देण्यात येतात. मात्र शासकीय आश्रम शाळेतील शिक्षक स्वच्छता, सफाई कर्मचाºयाऐवजी आश्रमशाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांकडूनच करवून घेत असल्याचे उघडकीस आले़ दरम्यान आदिवासी विकास विभागासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर असतांना देखील रोजंदारी तत्वावर आश्रमशाळेत पदे भरली जावून स्वच्छतेची कामे विद्यार्थ्यांकडूनच करवून घेतली जातात़
पदे रिक्त; विद्यार्थ्यांचे नुकसान
येथील आश्रम शाळेत पाचवीतील वर्गासाठी शिक्षक नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही विषय शिकविला जात नाही़ शिवाय माध्यमिक वर्गातील मराठी व इतिहास विषयाचे दोन शिक्षकांचे पदे रिक्त आहेत़ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपण्यात आले असल्यावर देखील अद्याप येथील शिक्षकांचे पदे भरण्यात न आल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़
सुरक्षा व सफाई विद्यार्थ्यांकडून
सुकापूर आदिवासी आश्रमशाळेत प्राथमिक व माध्यमिक विभाग मिळून शिक्षकांच्या ३ जागा रिक्त आहेत. तसेच सुरक्षारक्षक, सफाई कर्र्मचारीही नसल्याने येथील विद्यार्थ्यांकडूनच शाळेसह साफसफाई, स्वच्छतागृह व शौचालयाची स्वच्छता पाचवीतील विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात येते.
आदिवासी संघटनेचा घेराव
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व स्वच्छता करण्याबाबत प्रकार उघडकीस असल्याने आदिवासी संघटनेने मुख्याध्यापक कार्यालय, प्रकल्प अधिकारी प्रकल्प समितीचे अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, सदस्य डॉ.तुळशीराम गावित, डॉ. विशाल वळवी यांच्या कार्यालयाचा दरवाजा बंद केला होता़ जोपर्यत जिल्हाधिकारी घटनास्थळी पाहणीसाठी येत नाही तोपर्यत दरवाजा उघडणार नसल्याचा पवित्रा अभियान पदाधिकाºयांनी घेतला. यावेळी सुकापूरचे सरपंच पंडित चौरे, उपसरपंच सोमनाथ गावीत आदिवासी बचाव अभियान शाखा साक्रीचे तालुका उपप्रमुख गणेश गावीत, जिल्हाध्यक्ष तानाजी बहिरम, सचिव उदय सूर्यवंशी, प्रेमचंद सोनवणे, भारतीय ट्रायबल पार्टीच्या पदाधिकाºयांनी घेराव घातला होता़

Web Title: Cleanliness of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे