धुळ्यात व्यापा-यास मारहाण प्रकरणी व्यापा-यांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:59 AM2018-03-23T11:59:02+5:302018-03-23T11:59:02+5:30
पाच कंदील चौकात व्यापा-यांची निदर्शने, दोन तास बाजारपेठ बंद, मनपा अधिकाºयांच्या लेखी आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील मुख्य बाजारपेठेतील पाच कंदील चौक परिसरात गुरूवारी रात्री कचरा टाकण्यावरून व्यापाºयास झालेल्या मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी १० वाजता व्यापाºयांनी बंद पुकारून निदर्शने केली. पाच कंदील परिसर लोटगाड्या मुक्त करण्याची मागणी केली. मनपा अधिकाºयांनी घटनास्थळी येऊन व्यापाºयांशी चर्चा करून त्यांना लेखी आश्वासन दिले. परंतु यामुळे बाजारपेठ दोन तास ठप्प झाली. त्यामुळे सकाळी बाजारासाठी आलेल्या ग्राहकांना विन्मुख होऊन परत जावे लागले.
शहरात आग्रारोड मुख्य बाजारपेठेत पाच कंदील चौकात लोटगाडीधारक व्यवसाय करतात. दिवसभरात निर्माण झालेला कचरा तेथेच टाकून दिला जातो. त्यामुळे गुरूवारी रात्री या कारणावरूनच वाद निर्माण होऊन दोन गटात धक्काबुक्की झाली होती. यामुळे दोन्ही बाजूंनी जमाव समोरासमोर आल्याने पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त तैनात करून नियंत्रण मिळवले होते. रात्री बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता.
व्यापा-यांचा बंद व निदर्शने
दरम्यान, शुक्रवारी सकाळी कालच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच पाच कंदील चौकात लोटगाड्यांवर व्यवसाय करण्यास बंदी घालावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी व्यापाºयांनी आपले व्यवसाय बंद ठेवले. जोपर्यंत मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. जिल्हाभरातून या बाजारपेठेत ग्राहक येतात. या बंदचा फटका त्यांना बसू नये तसेच मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मनपाचे सहायक आयुक्त , नगर सचिव मनोज वाघ, ओव्हरसियर सी.एम. उगले आदींनी आंदोलन स्थळी जाऊन व्यापाºयांशी सविस्तर चर्चा केली. तसेच लेखी आश्वासन दिले.