वर्षाअखेरची सर्वाधिक थंडीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:13 PM2019-12-28T23:13:27+5:302019-12-28T23:14:03+5:30

तापमानाचा पारा ६ अशांवर । दोन दिवसांपासून थंडीत वाढ, धुक्यासह गारवा

The coldest day of the year | वर्षाअखेरची सर्वाधिक थंडीची नोंद

Dhule

Next

धुळे : थंडीचा कडाका शहरात वाढू लागला आहे. शनिवारी तापमानाचा पारा ६ अंशावर येऊन ठेपला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सकाळी १० वाजेनंतर रस्त्यावर गर्दी दिसली. पहाटे थंडीचे बाहेर पडणे नागरिकांनी टाळले. दोन दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढल्याने धुळेकरांना सकाळपासून हुडहुडी जाणवत आहे.
मागील चार ते पाच दिवसांपासून शहराच्या किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत होता. रविवारपासून किमान तापमानात ढगाळ हवामानामुळे वाढ होऊ लागली. गेल्या शुक्रवारी शहराचा पारा ९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे धुळेकरांना चांगलेच गारठले होते. त्या तुलनेत थंडीचा जोर कमी झाला. शुक्रवार व शनिवार रोजी राज्यात नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली होती. शनिवारी वर्षभरातील सर्वाधिक कमी तापमान ६ अंश इतके नोंदविण्यात आले़ शहरात पहाटे धुके पडत होते़ सकाळी शहरातील झुलता पुल धुक्याने दिसेना झाला होतो़ जणू धुक्याची चादर पांघरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वाढत्या थंडीने काही दिवसांपासून उबदार कपड्यांची विक्री होतांना दिसून येत आहे़ दूधविक्रेते, पेपरविके्रते, शालेय मुलांची वाहतूक करणारे वाहनचालक तसेच विद्यार्थी थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाय-योजना करीत आहे़ तापमान कमी झाल्याने वातावरण गारठले होते.

Web Title: The coldest day of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे