उभ्या बसला ट्रकची धडक, वाहकासह दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 12:58 PM2017-06-18T12:58:20+5:302017-06-18T12:58:20+5:30

पुरमेपाडा जवळील घटना

The collapsed bus hit the truck, and killed two people along with the vehicle | उभ्या बसला ट्रकची धडक, वाहकासह दोघे ठार

उभ्या बसला ट्रकची धडक, वाहकासह दोघे ठार

Next

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.18- उभ्या बसला मागून येणा:या भरधाव ट्रकने धडक दिलेल्या बस वाहक व प्रवासी असे दोघे ठार झाल़े हा अपघात रविवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा गावाजवळ घडला आह़े 
बस वाहक नदीम खान अन्वरखान पठाण (वय 27 रा़ पाळधी जि़ जळगाव) व प्रवासी महमद अक्रमशेख उस्मान शेख (वय 42 रा़ बुलढाणा) अशी दोघांची नावे आहेत़  जळगाव येथील बसचे टायर पुरमेपाडा गावाजवळ पंर झाल़े त्यामुळे रविवारी पहाटे एक ते दीड वाजेच्या सुमारास बसचे टायर बदलण्याचे काम सुरू होत़े त्याच वेळी मागून भरधाव वेगाने येणा:या ट्रकने बसला धडक दिली़ त्यात दोघे ठार झाल़े दोघांना टोल नाक्यावरील रूग्णावाहीकेव्दारे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल़े  तेथे डॉक्टरांनी तपासणी करून दोघांना मृत घोषीत केल़े 

Web Title: The collapsed bus hit the truck, and killed two people along with the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.