धुळे जिल्हा शिक्षक सेनेतर्फे सैनिक साह्य निधीचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:19 AM2019-07-04T11:19:38+5:302019-07-04T11:20:30+5:30
६६८०० रूपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द
आॅनलाइन लोकमत
धुळे : पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत जवानांच्या प्रति आदरांजली म्हणून धुळे जिल्हा शिक्षक सेनेने सैनिक साह्य निधी स्वेच्छेने देण्याचे आवाहन जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना केले होते. याला शिक्षक-शिक्षिकांनी प्रतिसाद देत, ६६ हजार ८०० रूपयांचा निधी जमा करण्यात आला.
शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिषजी पवार यांच्या हस्ते सदर सैनिक निधी ६६८००रुपयांचा धनादेश धुळे जिल्हाधिकारी राहूल रेखावार साहेब यांच्याकडे सुपूर्द केला.
शिक्षक हिताचे काम करतांना समाजहित व सैनिकाप्रती आदर दाखवून सामाजिक भावना जपणाºया शिक्षक सेनेच्या कार्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार व शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी कौतुक केले.
शिक्षक सेनेच्या माध्यमातून येणाºया कुठल्याही उपक्रमाला नेहमीच पाठिंबा राहील. तसेच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न वेळोवेळी मार्गी लावण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी उपस्थितांना दिले.
यावेळी शिक्षक सेनेच्यावतीने सी एन. पाटील, अशोक तोरवणे, सुधीर पाटील, उमाकांत गुरव, राकेश पाटील, मनोहर शिंदे, विजयानंद शिरसाठ, दिनेश श्रीराव, जगदीश बडगुजर, सतिश चौधरी,चंद्रकांत चौधरी, अनिल चौधरी, आदी उपस्थित होते. शिक्षकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.