धुळे शहरात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By Admin | Published: June 5, 2017 12:33 PM2017-06-05T12:33:55+5:302017-06-05T12:33:55+5:30

शेतकरी संप : लोणखेडी, उडाणे येथील शेतक:यांचे आंदोलन

Collective response to 'Bandh' in Dhule city | धुळे शहरात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद

धुळे शहरात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

धुळे , दि.5 -  शेतक:यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक देण्यात आली होती. परंतु, त्याला धुळे शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र,  धुळे तालुक्यातील लोणखेडी, उडाणे, कुसुंबा येथील संतप्त शेतक:यांनी आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच रस्त्यावर कांदा व दूध फेकून सरकाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. 
धुळ्यात शिवसेनेच्या कार्यकत्र्याना अटक 
‘बंद’ची हाक दिल्यानंतर धुळे शहरात सोमवारी सकाळी धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्रेते सकाळी नेहमीप्रमाणे दाखल झाले होते. तसेच पाचकंदील परिसर, दत्तमंदिर, नेहरू चौकातील खूंट परिसर, जुना आग्रारोड, मोठा पूर परिसरातही भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने मांडली होती. 
या विक्रेत्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन धुळ्यातील शिवसेनेच्या पदाधिका:यांनी केले. यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, भूपेंद्र लहामगे, पंकज गोरे, डॉ. माधुरी बोरसे, अतुल सोनवणे उपस्थित होते. शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक असल्याचे पाहून जुना आग्रारोडवरील विक्रेत्यांनी दुकाने बंद केली. परंतु, तत्काळ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर  संतप्त शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केल्याने या परिसरातील दुकाने पूर्ववत सुरू झाली. 
300 क्विंटल भाजीपाल्याची आवक 
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सकाळी 300 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. परंतु, नेहमीपेक्षा ही आवक खूपच कमी असल्यामुळे सकाळी दहा वाजेनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. 
दोंडाईचा शहरात शिवसैनिकांची मोटरसायकल रॅली 
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात सोमवारी शिवसैनिकांनी मोटरसायकल रॅली काढत, व्यापारी व दुकानदारांना त्यांचे दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. दोंडाईचासह शिंदखेडा शहरातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 
पिंपळनेर येथे सुरळीत; तर वार्साचा आठवडे बाजार बंद 
नाशिक येथे रविवारी दुपारी झालेल्या बैठकीनंतर पिंपळनेर शहर बंद ठेवण्याचा निर्णय उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेने घेतला होता. परंतु, पिंपळनेर शहरात त्याला अपेक्षित प्रतिसाद कुणीही दिला नाही. परंतु, बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक ही अतिशय कमी होती; तर साक्री तालुक्यातील वार्सा येथील सोमवारी भरणारा आठवडे बाजार कडकडीत बंद दिसून आला. 
धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये आंदोलन 
धुळे तालुक्यातील उडाणे, लोणखेडी, लोणखेडी फाटा, कुसुंबा, कापडणे परिसरातील शेतक:यांनी आंदोलन करत सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. 
 

Web Title: Collective response to 'Bandh' in Dhule city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.