दुचाकीचा रंग आणि डिझाईनवरुन लुटीच्या आरोपीला केले गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 10:54 PM2019-12-24T22:54:29+5:302019-12-24T22:54:50+5:30

धुळयातील घटना : अमळनेरच्या व्यापाऱ्याला लुटल्याप्रकरणी पोलिसांची कामगिरी

The color of the bike and the design made Gajiad accused of robbery | दुचाकीचा रंग आणि डिझाईनवरुन लुटीच्या आरोपीला केले गजाआड

दुचाकीचा रंग आणि डिझाईनवरुन लुटीच्या आरोपीला केले गजाआड

googlenewsNext

धुळे : अमळनेर येथील व्यापाºयाला लूटल्याच्या घटनेतील संशयितांच्या दुचाकीचा रंग आणि त्यावरील डिझाईन यावरुन आझादनगर पोलिसांना मोहाडीतून एका संशयिताला अटक करण्यात यश आले. त्याला न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली़
अमळनेर येथील व्यापारी जैनुद्दीन शेख पुणे जाण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास धुळे शहराजवळ पारोळा चौफुलीवर उभे होते. अंधाराचा फायदा घेऊन तीन जण दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यांनी जैनुद्दीन शेख यांना धमकाविले. नंतर ते लुटारु व्यापाºयाकडील ३५ हजार रुपये रोख आणि मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला. घटनेनंतर व्यापाºयाने आझादनगर पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती कथन केली़ त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे अज्ञात लुटारुंच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
सुरुवातीला पोलिसांनी माहितीच्या आधारावर स्केच काढून तपास करण्याचा प्रयत्न केला़ पण, त्याला प्रतिसाद मिळाला नाही़ शेवटी चर्चेतून दुचाकी कोणती, कोणत्या रंगाची आणि त्याच्यावर असलेली डिझाईन या प्रकारे सुक्ष्म माहितीचा आधार घेण्यात आला़ पोलिस पथकाने वरखेडी, फागणे, वणी, बाळापूर, वडजाई, सौंदाणे व मोहाडी परिसरात कसून तपास सुरु होता. परंतू यश हाती लागत नव्हते. तेव्हा पोलिसांनी फिर्यादीने लुटीला आलेले तरुण हे ज्या मोटारसायकलवर आले होते. त्याचा रंग आणि नंबर प्लेटवर असलेले डिझाईनसंदर्भात दिलेल्या माहितीचा आधार घेऊन तशाप्रकारच्या मोटारसायकलचा तपास सुरु केला. तशा संशयित १५ ते २० मोटारसायकलस्वारांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेव्हा शेवटी मोहाडीतील विजय भगवान पाटील (२१) या संशयिताची ओळख पटली. तेव्हा आझादनगर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला जेरबंद केले़ त्याचे अन्य दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत़
संशयित विजय पाटील याला न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठाविली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मुक्तार सैय्यद, हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, पोलीस कर्मचारी रमेश माळी, सुनील पाथरवट, संजय भोई, शोएब बेग, अतिक शेख यांनी पार पाडली.
आझादनगर पोलिसांनी पकडलेल्या संशयिताची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही़ त्याच्यावर कोणतेही गुन्हे असल्याचे रेकॉर्ड नाही़ असे असताना अतिशय कुशलतेने त्याला पकडण्यात आले आहे़

Web Title: The color of the bike and the design made Gajiad accused of robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.