जुगाराचा रंगलेला खेळ पोलिसांनी उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 08:53 PM2020-04-26T20:53:11+5:302020-04-26T20:53:34+5:30

लळींग शिवार : ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल

The colorful game of gambling was foiled by the police | जुगाराचा रंगलेला खेळ पोलिसांनी उधळला

जुगाराचा रंगलेला खेळ पोलिसांनी उधळला

googlenewsNext

धुळे : तालुक्यातील लळींग गावाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडाच्या बाजुला एका घराच्या आडोश्याला रंगलेला जुगाराचा खेळ मोहाडी पोलिसांच्या पथकाने उधळून लावला़ ही कारवाई शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली़ याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात ११ जणांविरुध्द सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, सर्व ११ जण हे लळींग ता़ धुळे येथील रहिवाशी आहेत़
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी गर्दी करु नये, घरातच थांबावे असे वेळोवेळी प्रशासनाकडून आवाहन केले जात आहेत़ न ऐकणाऱ्यांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जात आहेत़ हे सर्व माहित असताना सुध्दा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील लळींग गावाकडे येणाºया सर्व्हिस रोडलगत एका घराच्या भिंतीच्या अडोश्याला जुगाराचा खेळ सुरु असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली़ माहिती मिळताच पथकाने छापा टाकला, त्यावेळी जुगाराचा खेळ सुरु होता़ जुगार खेळणाºया ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्यांच्या जवळून ४ हजार ४२० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत़ या सर्वांविरोधात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी धिरज गवते यांनी फिर्याद दाखल केली़
त्यानुसार, महेंद्र पितांबर वाकडे, बन्सी भिका बळसाणे, मनोज नकूल साबळे, सुनील देवराम पाटोळे, जितेंद्र देवराम पाटोळे, वाल्मिक बळीराम पाटोळे, विवेक विष्णू बळसाणे, सुरेंद्र साहेबसिंग परदेशी, किशोर नानाजी बैसाणे, विजय श्रीराम बलसाणे, निंबाजी फकिरा बोरसे (सर्व रा़ लळींग ता़ धुळे) या सर्व संशयितांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ दरम्यान, लळींग गावात घटनेची चर्चा सुरु आहे़

Web Title: The colorful game of gambling was foiled by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे