धुळयातील १३६ कोटींच्या पाणी योजनेची आयुक्तांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:37 AM2018-03-14T11:37:51+5:302018-03-14T11:37:51+5:30

आतापर्यंतच्या कामाचा आढावा, ४९ कोटीतून ५५ टक्के काम पूर्ण

The commissioner of water scheme of 136 crores has been surveyed | धुळयातील १३६ कोटींच्या पाणी योजनेची आयुक्तांकडून पाहणी

धुळयातील १३६ कोटींच्या पाणी योजनेची आयुक्तांकडून पाहणी

googlenewsNext
ठळक मुद्दे-उपजलवाहिन्यांचे काम १९० किमी, मुख्य जलवाहिन्या ९ किमी पूर्ण -सद्यस्थितीत ७ जलकुंभांची कामे प्रगतिपथावर -पाणी योजनेच्या कामास ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटींच्या पाणी योजनेतील कामांची पाहणी मनपा आयुक्तांनी सोमवारी केली़ यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारीही उपस्थित होते़ पाणी योजनेचे आतापर्यंत ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे़
महापालिकेच्या १३६ कोटी रूपयांच्या पाणी योजनेचे काम बºयाच गोंधळानंतर अखेर मार्गी लागले आहे़ मनपा आयुक्तांकडून या योजनेच्या कामाचा दर आठवड्याला शुक्रवारी आढावा घेतला जात असल्याने योजनेच्या कामाला गती मिळाली आहे़ दरम्यान, सोमवारी दुपारी साडेतीन वाजता मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पाणी योजनेच्या कामांची पाहणी केली़ यावेळी अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत उगले, मजीप्राचे उपअभियंता व्हीक़े़सूर्यवंशी, शाखा अभियंता एस़व्ही़वाणी, पी़बी़राठोड, ठेकेदाराचे प्रतिनिधी शिंदे उपस्थित होते़ आयुक्तांनी हनुमान टेकडी ते चक्करबर्डी जलवाहिनीसह मोहाडी, नगावबारी, वरखेडी येथे सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामांची पाहणी केली़ तसेच मजीप्राच्या कार्यालयात पाणी योजनेच्या कामाचा आराखडा तपासून आढावादेखील घेतला़ १३६ कोटींच्या पाणी योजनेत आतापर्यंत ४८़९८ कोटी रुपयांचे काम पूर्णत्वास आले आहे़ उर्वरित कामेदेखील वेगाने पूर्ण करावीत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या़ तसेच मनपा अधिकाºयांनीही योजनेच्या कामात सहकार्य करण्याचे आदेशही त्यांनी दिले़ पाणी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम ५५ टक्के पूर्ण झाले असले तरी मनपाने दुसºया टप्प्यातील निधीची मागणी यापूर्वी केली आहे़ पाणी योजनेत सद्यस्थितीत उप जलवाहिन्या, मुख्य जलवाहिन्या व जलकुंभांची कामे प्रगतिपथावर आहेत़  शहरातील अनेक प्रभागात पाणी योजनेत पूर्ण झालेल्या जलवाहिन्यांचे लोकार्पण यापूर्वी करण्यात आले आहे़

 

Web Title: The commissioner of water scheme of 136 crores has been surveyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.