समिती सदस्यांकडून ‘स्वच्छते’ची पाहणी!

By admin | Published: January 21, 2017 12:04 AM2017-01-21T00:04:42+5:302017-01-21T00:04:42+5:30

धुळे : स्वच्छ सव्रेक्षण 2017 अंतर्गत शहरातील विविध भागांची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दाखल झाल़े

Committee members inspect 'Cleanliness'! | समिती सदस्यांकडून ‘स्वच्छते’ची पाहणी!

समिती सदस्यांकडून ‘स्वच्छते’ची पाहणी!

Next


धुळे : स्वच्छ सव्रेक्षण 2017 अंतर्गत शहरातील विविध भागांची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दाखल झाल़े प्राथमिक बैठकीनंतर त्यांनी पाहणी करण्यास सुरुवात केली़ त्याच वेळेस काही सदस्यांनी कागदपत्रेही तपासली़ दरम्यान, समिती शनिवारी शहरातील स्वच्छतेची पाहणी करणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितल़े
महापालिकेने नोव्हेंबर 2016 या महिन्यापासूनच स्वच्छतेच्या तयारीला सुरुवात केली होती़ स्वच्छ महाराष्ट्र सव्रेक्षणांतर्गत सहभाग घेतला होता़ या आनुषंगाने पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली समिती शुक्रवारपासून दोन दिवसांच्या दौ:यावर आली आह़े समितीने सकाळी साडेदहा वाजता एकवीरादेवीचे दर्शन घेऊन कामाचा शुभारंभ केला़ दर्शन घेतल्यानंतर समिती महापालिकेत दाखल झाली़ त्यानंतर प्राथमिक बैठक घेतल्यावर समितीचे काही सदस्य प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रवाना झाले, तर काहींनी कागदपत्र तपासणे पसंत केल़े
सुरुवातीला शहरातील दसेरा मैदान परिसरात समिती दाखल झाली़ त्यानंतर पाचकंदील भागात रवाना झाली़ या वेळी मोबाइलद्वारे या ठिकाणचे फोटो काढण्यात आल़े विक्रेत्यांशीही संवाद साधत कचराकुंडी आहे का? अशी विचारणा केली़ यावर सकाळी आणि सायंकाळी कचरा संकलन होतो असे अधिका:यांकडून सांगण्यात आल़े तेथून जवळच ऊसगल्लीतील महिला शौचालयांची पाहणी करण्यात आली़ या वेळी
महापालिकेचे अधिकारी दौ:यात सहभागी झाले होत़े
दोन पथकांची नियुक्ती
समितीच्या सदस्यांनी दोन वेगवेगळ्या पथकाची नियुक्ती केली होती़ त्यातील पहिल्या पथकाने माधवपुरा, पेठ भाग, फिश मार्केट, पाचकंदिल परिसर, पाचकंदिल मार्केट, चर्नी रोड, देवपुरातील दत्तमंदिर परिसर, देवपुरातील भाजीपाला मार्केट, विटाभट्टी शौचालय व परिसर, लाला सरदार नगर, रमजानबाबा नगर, 80 फुटी रोड, मोहाडी उपनगरातील दंडेवालाबाबा नगर या भागाची पाहणी केली़ यावेळी समिती सदस्य संकेत गोराणे यांच्यासोबत शहर अभियंता कैलास शिंदे, ओव्हरसिअर चंद्रकांत उगले सहभागी होत़े तर दुस:या पथकात यशवंत नगर, राजीव गांधी नगर, आग्रा रोड, शहर बसस्थानक, शहर पोलीस चौकी शौचालय, दसेरा मैदान परिसर, दूध डेअरी रहिवास कॉलनी, कुमार नगर भाजी मार्केट या भागाची पाहणी केली़ समिती सदस्य कमलेश मिशाह यांच्यासोबत उपायुक्त रवींद्र जाधव, ओव्हरसिअर पी़ डी़ चव्हाण सहभागी होत़े
नागरीकांशी औपचारीक संवाद
गुणवत्ता तपासणी समितीमार्फत पाहणी करत असताना समितीच्या सदस्यांनी नागरिकांशी चर्चा केली़ जागांचे फोटो जीओ टॅगिंगद्वारे घेतल़े
दरम्यान, महापालिकेत वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला होता़ 

 

केंद्रीय समितीच्या सदस्यांकडून शहरातील विविध भागांची पाहणी करण्याचे काम सुरू झाले आह़े पाहणी ही गोपनीय असून यावर लागलीच भाष्यही होऊ शकत नाही़ शनिवारी दुपारून याबाबत प्राथमिक माहिती देण्यात येईल़
-विजय सनेर

Web Title: Committee members inspect 'Cleanliness'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.