Vidhan Sabha 2019 : बैलगाडीवरुन साधला जनतेशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:25 PM2019-10-05T23:25:13+5:302019-10-05T23:26:10+5:30

धुळे ग्रामीण। कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ पत्नी अश्विनी पाटील मंदानात

Communicating with the public through a bullock cart | Vidhan Sabha 2019 : बैलगाडीवरुन साधला जनतेशी संवाद

dhule

Next

dधुळे : शेती आणि मातीशी नाते सांगत तालुक्यातील शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे, बळीराजा समृद्ध झाला पाहिजे म्हणून आमदार कुणाल पाटील हे धुळे तालुक्यात काम करीत आहेत, असे सांगत अश्विनी पाटील ह्या तालुक्यातील महिलांशी थेट संवाद साधत आहेत. दरम्यान शेतकऱ्याचे जीवापाड प्रेम असणाºया बैलगाडीवर शिरधाणे गावापासून ते गुलाबवाडीपयत पाटील यांनी प्रवास करीत आपल्या परिवाराचे नाते मातीशी घट्ट असल्याचा संदेश त्यांनी ग्रामस्थांना करुन दिला.
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी नेहमीच तालुक्यातील सर्व सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांसाठी काम करीत असतात. त्यांच्या या राजकीय आणि सामाजिक प्रवासात त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील ह्या नेहमीच पुढे असतात. दोन्हीही उच्च शिक्षित असले तरीही तालुक्यातील शेतकरी आणि मातीशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. गोरगरीब जनता आणि शेतकºयांच्या दैनंदिन जीवनाशी एकरुप होत अश्विनी पाटील ह्या सध्या धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये महिला, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या भेटी घेत आहेत. कधी पायी, ट्रॅक्टरवर तर कधी शेतकºयांचा जीवलग सखा बैलगाडीवरस्वार होत वाड्यावस्त्यावर पोहचत आहेत.
त्यांनी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नुकतेच शिरधाणे प्र.नेर, खंडलाय, खु., बांबुर्ले, खंडलाय बु. तसेच मुकटी येथे जाऊन येथील ग्रामस्थ शेतकरी, महिला यांच्या भेटी घेतल्या. भेटी दरम्यान त्यांनी बैलगाडीवर बसून शिरधाणे प्र.नेर येथील गुलाबवाडीपर्यंत प्रवास केला. यावेळी अश्विनी पाटील यांनी महिला व शेतकºयांसह तरुण - तरुणी यांच्याशीही संवाद साधला तसेच त्यांच्याकडून परिसरातील अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी त्यांच्यासोबत शिरधणे प्र.नेर येथील जनाबाई महाले, रेखाबाई भदाणे, सुशिलाबाई भदाणे, गिताबाई भदाणे, इंदूबाई भदाणे, देवकाबाई भदाणे, लताबाई भदाणे, वैशाली सोनवणे, पं.स.चे माजी सभापती दिनेश भदाणे, सरपंच जिभाऊ पाटील, उपसरपंच गोरख पाटील यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Communicating with the public through a bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे