सर्वसामान्यांशी पारावर संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:36 PM2019-09-22T12:36:07+5:302019-09-22T12:36:49+5:30
पीकपाण्याच्या गप्पा । कुणाल पाटील यांचा उपक्रम भावला
धुळे : तालुक्यातील न्याहळोद येथील बसस्थानकाजवळील हनुमान मंदिराच्या पारावर सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांमध्ये जाऊन आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आपण केलेल्या कामांची चर्चा करत ते खरीप हंगामातील पीक परिस्थिती आणि पाऊसपाण्याच्या गप्पांमध्ये रमले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुख-दु:खाची जाणीव ठेवणारे पाटील यांचे व्यक्तिमत्व भावल्याने पारावरील सर्वांनीच समाधान व्यक्त केले.
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी शुक्रवार २० रोजी तालुक्यातील न्याहळोद, बिलाडी, कुंडाणे, निमखेडी, धनूर येथील ग्रामस्थांच्या व शेतकºयांच्या भेटीगाठी घेत खरीपातील पीकपाण्याची माहिती जाणून घेतली. न्याहळोद येथील पारावर बसून तेथेच पाटील यांनी शेतकºयांचे विजेचे प्रश्न, दुष्काळी अनुदान व दैनंदिन प्रश्न मार्गी लावले. तालुक्यात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखाही मांडला. न्याहळोद येथे आदिवासी समाज मंदीर, कोळी समाज मंदीर, महादेव मंदीर पेव्हर ब्लॉक, मंगल कार्यालय, आरोग्य केंद्राची दुरुस्ती, अमरधामशेड बांधकाम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण आदी कामांसाठी निधी मंजूर करून पूर्णत्वास आणली. शेतकºयांसाठी लढणारा आमदार म्हणून मला सरकारने निलंबित केले, असेही ते म्हणाले.
यावेळी कुणाल पाटील यांच्यासोबत ज्येष्ठ नेते किर्तीमंत कौठळकर, माजी पं.स. सदस्य मुकेश पवार, ज्ञानेश्वर मराठे, माजी सरपंच डॉ.भरत रोकडे, उपसरपंच प्रतापराव माळी, प्रकाश वाघ, शिवाजी रोकडे, गणेश चौधरी, पंडित भावसार, कल्पेश रायते, अल्ताफ खाटीक, अंजनाबाई माळी, दीपक वाघ, कुंडाणे सरपंच प्रिया सिसोदे, सागर पाटील, उपसरपंच भाऊसाहेब पाटील, सुनील मोरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.