कंपनीने कर्मचा-यांचे पगार थकविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 09:45 PM2018-12-11T21:45:31+5:302018-12-11T21:46:12+5:30
तक्रार : आज कंपनीसमोर ठिय्या आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नरडाणा बाभळे एमआयडीसीत असलेल्या कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून पगार थकविले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याची तक्रार कामगारांनी जिल्हाप्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान न्यायासाठी १२ रोजी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
नरडाणा येथील बाभळे एमआयडीसीत असलेल्या एका खाजगी कंपनीत अनेक कामगार कामाला आहेत. कंपनी व्यवस्थापनाने तीन महिन्यांपासून पगार थकविल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. चार वर्षांपासून पगारवाढ दिलेली नाही. कामगारांना मुलभूत सुविधा न देता, काम करण्यास भाग पाडले जाते. ज्या कामगारांनी सुविधांविषयी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, त्या कामगारांना कंपनीने कामावरून काढून टाकले जाते. कंपनीमध्ये जाणून-बुजून दुसºया विभागात बदली केली जाते. त्यामुळे सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.
न्याय हक्क मागण्यांसाठी १२ रोजी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे कामगारांनी कळविले आहे.
निवेदनावर नीलेश वानखेडे, प्रकाश सोनवणे, निंबा पाटील, स्वप्नील वानखेडे, गणेश भामरे, संजय झाल्टे, प्रशांत महाजन, रवींद्र बिºहाडे, नारायण पाटील, नगराज पाटील, भूषण पवार, अक्षय पाटील आदींची नावे आहेत. निवेदन कामगार आयुक्त धुळे, तहसीलदार शिंदखेडा यांनाही पाठविण्यात आले आहे.