वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 01:35 PM2020-09-06T13:35:39+5:302020-09-06T13:35:59+5:30

कुटुंब संपविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

Compensate for land that has been carried away | वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला द्या

वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला द्या

googlenewsNext

चिमठाणे : बंधाºयामुळे शेतजमिनीचा बहुतांश भाग हा वाहून गेला आहे़ वारंवार मागणी करुनही त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही़ या शेतजमिनीवर कुटुंब अवलंबून आहे़ चरितार्थ कसा भागवयाचा त्याची चिंता आहे़ वाहून गेलेली शेतीचा मोबदला मिळत नसल्याने चिमठाणे येथील शेतकरी शरद श्रीधर कासार यांनी आपल्या कुटुंबानिशी जीवनयात्रा संपविण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना अर्जाद्वारे दिला आहे़
चिमठाणे व दलवाडे येथे बुराई नदीवर बांधण्यात आलेले साठवण बंधारे अतिवृष्टी व वाडी शेवाडी धरणातून पाणी सोडल्याने फुटून गेले होते. व बंधाºयाचे पाणी शेतात शिरल्याने २० आर क्षेत्र तसेच इतर शेतकºयांचे देखील क्षेत्र वाहून नुकसान झाले होते़ व शेतकºयांचे क्षेत्र माती पिकासह वाहून गेले होते. व जवाहर रोजगार अंतर्गत बांधून दिलेली विहिरीच्या आजूबाजूचे सर्व क्षेत्र देखील त्या पुरात वाहून गेले. सदर बंधाºयाचे बांधकाम हे निकुष्ठ दर्जाचे असल्याने माझे क्षेत्र वाहून गेले असे सदर शेतकºयाने अर्जात नमूद केले आहे.

Web Title: Compensate for land that has been carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे