वेतन पथक विभागाविषयी उपसंचालकांकडे तक्रार

By admin | Published: January 18, 2017 11:39 PM2017-01-18T23:39:45+5:302017-01-18T23:39:45+5:30

शिक्षक समन्वय समिती : आर्थिक कामांमध्ये अडवणुकीचा आरोप

Complaint to the Deputy Director regarding wage squad segment | वेतन पथक विभागाविषयी उपसंचालकांकडे तक्रार

वेतन पथक विभागाविषयी उपसंचालकांकडे तक्रार

Next



धुळे : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वेतन पथक विभागातील अनियमिततेविषयी जिल्हा शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षण उपसंचालक नाशिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी  प्रवीण पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.
समन्वय समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे        की, धुळे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांच्या वेतन पथकाबाबत अनेक लेखी व तोंडी तक्रारी समन्वय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे वेतन पथक अधीक्षक नितीन पाटील यांच्यासंदर्भात आलेली तक्रारींची तत्काळ दखल घेण्यात यावी. वेतन पथकाकडे कर्मचा:यांच्या आर्थिक कामांमध्ये मुद्दामहून टाळाटाळ केली जाते. सन 2013-14 चे अतिरिक्त शिक्षकांचे शालार्थ आय.डी. नसल्याने वेतन रखडले आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समावेशन झाल्यानंतर शिक्षणाधिकारी यांना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांचे वेतन अदा करण्याचे आदेशित केल्यावरदेखील वेतन अदा करत नाहीत. वेतन अधीक्षक कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यात सुयोग्य समन्वय नसल्याने समस्यांची लवकर सोडवणूक होत नाही.
वेतन पथक विभागाच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास व कार्यालयाची चौकशी न झाल्यास समन्वय समितीने 1 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती धुळे जिल्हा समन्वय समिती समन्वयक संजय एल.      पवार, वि.मा. भामरे, मदनलाल मिश्रा, एस.बी. सूर्यवंशी, विजय बोरसे, बी.डी.भदोरिया, बी.ए.पाटील, महेश मुळे, एस.आर. देशमुख, जे.बी.पाटील, अशपाक खाटीक, आनंद पवार, लतीफ देशमुख, के.बी.नांद्रे, ए.बी. सोनवणे, सुनील पवार, आर.व्ही. पाटील, हेमंत ठाकरे, प्रा.डी.पी. पाटील, देवानंद ठाकूर, लोटन मोरे, विलास पाटील आदींनी दिली       आहे.

संघटनेच्या वतीने खोटे आरोप करून व खोटी कागदपत्रे सादर करून समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. संघटनेच्या नावाखाली दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षक व कर्मचा:यांची कामे मार्गी लावण्यासाठी नेहमीच आमचे प्रयत्न असतात.
-नितीन पाटील,
वेतन पथक अधीक्षक, माध्यमिक विभाग

Web Title: Complaint to the Deputy Director regarding wage squad segment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.