दोंडाईचात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:59 PM2018-07-23T22:59:26+5:302018-07-23T23:00:18+5:30

कारवाई : वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणीत आढळले नाही 

A complaint has been filed against a bogus doctor in Dondaicha | दोंडाईचात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

दोंडाईचात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देवैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही सुरु होता व्यवसायफसवणूक करणाºया डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही व्यवसाय करत शासन आणि सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाºया डॉक्टरच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत़ त्याच्याविरोधात दोंडाईचा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला़ ही कारवाई रविवारी करण्यात आली़ 
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन बोगस डॉक्टर शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार शहरासह जिल्ह्यात पथक तयार करण्यात आले असल्याने त्यांच्याकडून कारवाई सुरू झाली आहे़ दोंडाईचा शहरातील सोनार गल्ली येथे विजयकुमार निरापत रॉय (६५) यांचे वास्तव्य आहे़ चांदसी नावाने त्यांनी क्लिनीकदेखील सुरू केलेले आहे़ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांवर वेगवेगळ्या आजारावर उपचार केले जात होते़ या दवाखान्यात सर्व प्रकारच्या चर्मरोगावर उपचार होत होते़ वीर, भगंदर, मूळव्याध, बवासीर, फ्रिस्टल बिना आॅपरेशन उपचार होत होते़ जुना हरताप, संधीवात, गुप्तरोगावर उपचार केले जातील या नावांचे बोर्ड लावून सदर घरांमध्ये विजयकुमार रॉय यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय परिषदेचे नोंदणीचे प्रमाणपत्र नसतानाही व्यवसाय सुरू होता़ अधिकृत वैद्यकीय व्यवसायी असल्याचे भासवून त्यासंदर्भात जाहिरात करून शासनाची आणि सर्वसामान्य जनतेची त्यांच्याकडून फसवणूक सुरू होती़ अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करताना ते मिळून आले़ 
हा प्रकार रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पथकाकडून छापा टाकून पकडण्यात आला़ याप्रसंगी विजयकुमार रॉय यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पथकाने तपासणी केली असता त्यात बोगसपणा आढळून आला़ याप्रकरणी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ ललितकुमार भारतचंद्र यांनी रविवारी रात्री ११ वाजता दोंडाईचा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयित विजयकुमार रॉय यांच्याविरुध्द भादंवि कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८ सह महाराष्ट्र वैद्यकीय १९६१ चे कलम ३३ (२) तसेच औषधी द्रव्य आणि आक्षेपार्ह जाहिरात अधिनियम १९५४ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक मोरे घटनेचा पुढील तपास करीत आहेत़ 

Web Title: A complaint has been filed against a bogus doctor in Dondaicha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.