पैसेवाटपाची तक्रार, आमदार गोटे यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 15:51 IST2018-12-09T15:49:15+5:302018-12-09T15:51:53+5:30
आमदार कुणाल पाटील यांनीही केली पैसेवाटपाची तक्रार

पैसेवाटपाची तक्रार, आमदार गोटे यांचा ठिय्या
ठळक मुद्दे- घटनास्थळी गर्दी, तणावपूर्ण परिस्थिती-सर्रास पैसेवाटप होत असल्याची तक्रार-पोलीस बंदोबस्त तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील साक्री रोडवरील कुमार नगर परिसरात मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या कारणावरून आमदार अनिल गोटे यांनी एका घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे़
मतदारांना सर्रास पैसेवाटप सुरू असतांना पोलीस बघ्याची भुमिका घेत आहेत, भरारी पथके लक्ष देण्यास तयार नसल्याचे आमदारांचे म्हणणे आहे़ आमदार अनिल गोटे यांनी साक्री रोडवरील कुमार नगर परिसरात एका घरासमोर ठिय्या मांडला़ तर दुसरीकडे गोंदूर रोडवरील एका मतदान केंद्रासमोर पैसे वाटप केल्याच्या कारणावरून आमदार कुणाल पाटील यांनी प्रशासनाकडे तक्रार केली़ त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता़