Vidhan Sabha 2019 :सोपविलेले काम जबाबदारीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:18 PM2019-09-28T13:18:08+5:302019-09-28T13:24:55+5:30
जिल्हाधिकारी : प्रक्रियेसाठी नियुक्त समन्वय अधिकाऱ्यांना निर्देश
धुळे : राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला असून प्रत्येक समन्वयक अधिकाºयाने (नोडल आॅफिसर) दक्षता बाळगावी तसेच सोपविलेले काम जबाबदारीपूर्वक पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल, तहसीलदार सुचिता चव्हाण, स्थानिक लेखा निधी विभागाचे सहाय्यक संचालक बाबूलाल पाटील, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी भारत धिवरे आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवा
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व समन्वयक अधिकाºयांंनी परिपूर्ण नियोजन करावे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. त्यासाठी शिक्षण विभागाने वेगवेगळे उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची मदत घ्या
दिव्यांग मतदारांची माहिती संकलित करुन त्यांना मतदानासाठी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट- गाइडच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन त्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करावी. निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाºयांचे प्रशिक्षण, वाहतूक आराखडा, वाहनांची आवश्यकता यांचाही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आढावा घेतला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भामरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला सर्व संबंधित अधिकाºयांसह कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी अनुषंगिक अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले.