सुसरी धरण अद्यापही कोरडे असल्याने शेतकºयांमध्ये चिंता
By admin | Published: July 14, 2017 11:41 PM2017-07-14T23:41:13+5:302017-07-14T23:41:13+5:30
शहादा तालुक्यातील सुसरी धरण कोरडे असल्याने शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रायखेड : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरीही शहादा तालुक्यातील सुसरी धरण कोरडे असल्याने शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
सातपुड्यात उगम असलेल्या सुसरी नदीवर शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने होळमोहिदा व नवलपूर शिवारात सुसरी धरण बांधले आहे. आवगे, पाडळदा, चिखली, तिखोरा, परिवर्धा, कुढावद, होळमोहिदा, अलखेड, कलसाडी, भादे, धुरखेडा आदी गावातील शेतकºयांना या धरणातील पाण्याचा उपयोग होतो. यंदा पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी होऊनही हे धरण कोरडेच आहे.
धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा होईल या उद्देशाने दोन महिने जेसीबीच्या साहाय्याने गाळ काढण्यात आला आहे. मात्र धरण यंदाच्या पावसाळ्यात भरेल की नाही ही चिंता शेतकºयांना सतावत आहे.