बदलांना आत्मविश्वासाने सामोरे जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:52 AM2019-09-26T11:52:35+5:302019-09-26T11:52:55+5:30
ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांचे धुळ्यात प्रतिपादन
आॅनलाइन लोकमत
धुळे :वयात येतांना मुलींना अनेक शाररिक बदलांना सामोरे जावं लागते. या बदलांना आत्मविश्वासाने सामोरे जावे. तसेच लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग (गडचिरोली) यांनी सोमवारी येथे केले.
स्त्री शिक्षण संस्थेच्या कै. प्रा.वसंतराव यशवंतराव घासकडबी कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ‘तारूण्यभान’ शिबिराच्या उदघटनाप्रसंगी डॉ. बंग बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्ञानेश्वर पाटील, सुनंदा खोरगडे, राजेंद्र इसासरे, स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी होत्या.
डॉ. राणी बंग पुढे म्हणाल्या की, वयात येतांना वैय्यक्तीक स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रेम म्हणजे केवळ शाररिक आकर्षण नसून ते आत्मीक असावे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांनी ठोकळ्यांच्या खेळाद्वारे मुलींमध्ये आत्मविश्वास कशाप्रकारे वाढेल याची माहिती दिली. प्रयत्न करतांना अपयश आले तरी डगमगून न जाता आहे त्या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. तर सुनंदा खोरगडे यांनी जोडीदाराची निवड कशी केली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्राचार्या मनीषा जोशी यांनी तर सूत्रसंचालन क्रांती येवले यांनी केले.
यावेळी संस्थेच्या सहसचिव सुलभा भानगावकर, शिल्पा म्हस्कर, उपप्राचार्या मनीषा ठाकरे, साधना पाठक, चेतनकुमार शिसोदे आदी उपस्थित होते.
हे शिबिर अकरावी व बारावीतील विद्यार्थिनींसाठी असून, पहिल्या दिवशी सुमारे २०० विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या तीन दिवसीय शिबिरात माहिती, गाणी, मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करून दिला जाणार आहे.