कॉँग्रेस-भाजपाच्या पदाधिका-यांमध्ये शाब्दीक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:41 PM2017-10-18T16:41:46+5:302017-10-18T16:43:09+5:30
पालकमंत्री व अधिका-यांना घेराव : कार्यक्रमाला निमंत्रित करूनही दिले नाही शेतकºयांना प्रमाणपत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी आयोजित कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमासाठी ४० शेतकºयांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ २० शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरीत झाले. परिणामी, संतप्त शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांसोबत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त शेतकºयांना समज देण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी गेले असता कॉँग्रेस व भाजपाच्या पदाधिकाºयांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली. पुढे संतप्त शेतकºयांनी पालकमंत्री दादा भुसे व जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनाही घेराव घालत जाब विचारला.
राज्य शासनाने दिवाळीपूर्वी कर्जमाफी करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मंगळवारी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून जिल्ह्यातील निवडक शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी निमंत्रित करा, असे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर सायंकाळी उशिरापर्यंत नियोजन करून जिल्ह्यातील ४० शेतकºयांना निमंत्रिथ करण्यात आले होते.
सभागृहाबाहेर शेतकरी संतप्त
कार्यक्रम आटोपल्यानंतर सभागृृहाबाहेर पडताच धुळे तालुक्यातील धामणगाव येथील नंदलाल पोपट पाटील, राजेंद्र पाटील, निर्मला पवार, कल्पना पाटील यांच्यासह अन्य शेतकºयांनी संताप व्यक्त केला. यातील काही शेतकºयांनी आमदार कुणाल पाटील व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्याकडेही त्यांची कैफियत मांडली. तेव्हा संतप्त शेतकºयांसमवेत आमदार पाटील, सनेर व कॉँग्रेसच्या अन्य कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमासाठी ४० शेतकºयांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, प्रमाणपत्र केवळ वीसच छापलेले होते. त्यामुळे कार्यक्रमात उर्वरीत शेतकºयांचा सत्कार करता आला नाही.
- दादा भुसे, पालकमंत्री