धुळ्यात भाजपाला एकहाती सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 02:28 PM2018-12-10T14:28:48+5:302018-12-10T14:36:56+5:30
महापालिका निवडणूक निकाल : राष्टÑवादी - काँग्रेस आघाडी १४, शिवसेना दोन तर आमदार गोटेंच्या लोकसंग्रामला फक्त एक जागा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणुकीत गुंडगिरीसह सर्वच मुद्दे खोटे ठरवत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर विजय मिळवित सत्ता काबीज केली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची जादु धुळे महापालिकेतही चालली. महापालिकेत भाजपचा दुसºयांदा महापौर बसणार. तर राष्टÑवादी आणि काँग्रेस आघाडीने १४ जागा मिळविल्या आहे. शिवसेनेने सात जागांवरस विजय मिळविला. तर आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामने एक जागा मिळविली आहे.
यंदा धुळे महापालिका निवडणूक ही विकासाचा मुद्दा सोडून शहरातील वाढत्या गुंडगिरीच्या मुद्यावर लढविली गेली होती. भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी या मुद्यावर बंडखोरी करीत लोकसंग्रामकडून ५९ उमेदवार उभे केले होते. यापैकी त्यांचे चिरंजीव तेजस गोटे यांच्यासह एक जागा वगळता सर्वच उमेदवार पराभूत झाले आहे. मात्र त्यांच्या पत्नी हेमा गोटे यांनी प्रभाग पाच मधून भाजपच्या भारती मोरे यांचा पराभव करीत निसटता विजय मिळविला आहे.
राष्ट्रवादी - गेल्या १० वर्षापासून महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्टÑवादीला मोठा फटका बसला आहे. राष्टÑवादीच्या मातब्बर उमेदवारांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन भाजपने त्यांना उमेदवारी देत राष्टÑवादीच्या सत्तेला सुरुंग लावला होता. त्यामुळे राष्टÑवादी ही फक्त ९ जागांवरच थांबली. महापौर कल्पना महाले या विजयी झाल्यात.
काँग्रेस - काँग्रेस पक्षाला फक्त ५ जागा पक्षाला मिळाल्या. पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ यांचे चिरंजीव प्रितम करनकाळ पराभूत झाले.
शिवसेना - निवडणुकीत शिवसेनेला ही फटका बसला आहे. शिवसेनेचे मातब्बर उमेदवार महानगर प्रमुख संजय गुजराथी, महेश मिस्तरी, नरेंद्र परदेशी हे मातब्बर उमेदवार पराभूत झाले आहे. त्यांच्या पक्षाच्या ज्योस्रा पाटील यांनी मात्र आपली जागा कायम ठेवली. केवळ दोन जागा पक्षाला मिळाल्यात. धुळे महापालिकेत एमआयएमने आपले खाते उघडत दोन जागा मिळविल्या.
पक्षीय बलाबल
पक्ष २०१८ २०१३
भाजपा ५0 0३
काँग्रेस 0५ 0७
राष्ट्रवादी 0९ ३४
शिवसेना 0२ ११
लोकसंगाम ०१ 0१
सपा 0२ 0३
बसपा ०१ ०१
एमआयएम ०२ 00
अपक्ष ०२ १0