केंद्राच्या विरोधात कॉँग्रेस, शिवसेना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 08:08 PM2020-09-17T20:08:33+5:302020-09-17T20:08:47+5:30

कांदा निर्यात बंदी तत्काळ उठविण्याची मागणी : शिंदखेड्यात मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन

Congress, Shiv Sena on the streets against the Center | केंद्राच्या विरोधात कॉँग्रेस, शिवसेना रस्त्यावर

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/कापडणे/शिंदखेडा/साक्री/ शिरपूर/दोंडाईचा : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातीवर घातलेल्या तडकाफडकी बंदीचे पडसाद धुळे जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही उमटले. कॉँग्रेस,शिवसेना, राष्टÑवादी कॉँग्रेस या राजकीय पक्षांनी कांदा निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी शिंदखेडा, साक्री येथे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले. तर शिंदखेड्यात शिवसेनेने मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. शेतकरी संघटनेने मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गावरील कापडणे-देवभाने फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. दरम्यान केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी अशी एकमुखी मागणी केली.
शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको
केंद्र शासनाने कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. याचा निषेध करण्यासाठी व केंद्र शासनाला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी धुळे जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे १६ रोजी सकाळी १० वाजता मुंबई-आग्रा महामार्गावरील कापडणे-देवभाने फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनेने केलेल्या रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या होत्या. सोनगीर पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे संघटनेने आंदोलन मागे घेतले.
केंद्र शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन व कांद्याच्या माळागळ्यात घातल्या होत्या. कांदे रस्त्यावर टाकण्यात आले होते. याप्रसंगी धुळे जिल्हा शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम बळीराम पाटील यांनी भाजप सरकारचा ,शासनाचा कांदा निर्यात बंदीचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाविरोधात घोषणा देत, संताप व्यक्त केला. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य शांतीलाल दामोदर पटेल, धुळे तालुका अध्यक्ष भगवान झावरू पाटील, धुळे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष रवींद्र वाणी, जिल्हा संघटक नारायण हिलाल माळी, प्रदीप धनराज पाटील, हितेश खलाने, लक्ष्मण कारागीर, गुलाब दामू पाटील ,हिलाल मुकुंदा पाटील, भिका हिरामण पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रमेश माळी,किशोर माळी, जयेश माळी, भैया माळी, गणेश खलाने, सागर भटू पाटील, कृष्णा खलाणे, दिलीप वंजी माळी, प्रदीप पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
रास्ता रोको आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व पोलीस निरीक्षक नामदेव सहारे व कर्मचारी यांच्या मध्यस्थीने शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना योग्य ती समज देऊन आंदोलन बराच वेळेनंतर मागे घेण्यात आले. रास्ता रोको आंदोलन दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरती देवभाने ते सोनगीर व दुसºया बाजूला देवभाने ते नगाव अशा प्रकारे रोडाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.दरम्यान हे रास्तारोको आंदोलन शांततेत पार पडले.
गोराणे फाट्यावर रास्तारोको
सरकारच्या कांदा निर्यात बंदी धोरणाचा निषेध करण्यासाठी व कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्ग गोराणे फाट्यावर शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी धुळे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी यांनी केंद्र सरकारचा निषेध करून, कांदा निर्यात बंदीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली. विटाई येथील खैरनार यांनीही देखील आक्रोशात निषेध केला असून सदर रास्ता रोको आंदोलनात नरडाणा येथील डॉ. जगदीश बोरसे, नीळकंठ बारकू पवार, भगवान पाटील, प्रकाश पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश पाटील, मनोहर पाटील, साहेबराव पाटील, गुणवंतराव पवार यांच्यासह दीडशे ते दोनशे शेतकरी आंदोलनात सहभागी होते. नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरू व पाटील तसेच गोपनीय विभागाचे सोनवणे आदींनी बंदोबस्त ठेवला. आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. रास्तारोकोनंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
शिंदखेडा
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीच्या विरोधात आज तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार साहेबराव सोनवणे यानानिवेदन देण्यात आले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने काही कारण नसताना दूध भुकटीच्या आयातीचा निर्णय घेतला. हजारो टन दूध भुकटी राज्यात आणि देशात पडून असताना आयातीच्या घेतलेल्या निर्णयाने दुधाचे भाव कोसळले. आता केंद्र सरकारने निर्णय घेतलाय कांदा निर्यात बंदीचा. चार पैसे शेतकºयानला मिळण्याची वेळ आली की केंद्र सरकारने त्यावर घाला घातलाच म्हणून समजा.
कांदा निर्यात बंदीच्या या निर्णयाने कांद्याचे भाव प्रतिटन ७००-८०० रुपयांनी घसरले. काँग्रेस पक्ष यांचा निषेध करते.
निवेदन देतेवेळी शिंदखेडा तालुका काँग्रेस अध्यक्ष रावसाहेब पवार, नगरपंचायत विरोधीपक्षनेते सुनिल चौधरी, नगरसेवक दिपक अहिरे, शामकांत पाटील,उदय देसले, चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक सुभाष देसले, किरण थोरात, नरेंद्र पाटील, पावबा कोळी, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कुलदीप निकम,समद शेख, राकेश पाटील, गोविंदा माळी, माळी, सुनिल पाटील असंख्य पदाधिकारी उपस्थित होत.
साक्री
कांदा निर्यात बंदीविरोधात येथेही कॉँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर अचानक बंदी घालून शेतकºयांवर अन्याय केला. तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तुच्या यादीतून वगळण्याची घोषणा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. तीन महिन्यातच निर्णय बदलून कांदा उत्पादकांवर अन्याय केला आहे.केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी व शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात माजी आमदार डी.एस. अहिरे, साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, कार्याध्यक्ष दीपक साळुके,किसान कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज पाटील, साक्री शहर अध्यक्ष सचिन सोनवणे,पंचायत समीती सभापती प्रतिभा सुर्यवंशी,किसान कॉंग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष शांमभाऊ भांमरे, तालुकाध्यक्ष कपिल जाधव,युवक कॉँग्रेस अध्यक्ष आविनाश शिंदे, साक्री शहर युवक कॉंग्रेस आध्यक्ष प्रज्योत देसले,जयेश खैरनार, गणेश गावित, पंकज सुर्यवंशी, रमेश सुर्यवंशी, लक्ष्मीकांत सोनवणे, एकनाथ गुरव, प्रकाश राऊत, संजय बच्छाव, सचिन सुर्यवंशी, दिनेश बोरसे, धीरज अहिरराव, सागर देसले, राकेश सोनवणे, मनोज देसले, किशोर सोनवणे आदी उपस्थित होते.
दोंडाईचा
केंद्र शासनाने कांदा नियार्तीवर बंदी घातल्याचा विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने नंदुरबार चौफुलीला रस्तारोको अंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे,राष्ट्रवादी दोंडाईचा शहर उपाध्यक्ष राजू देशमुख,दोंडाईचा युवक शहराध्यक्ष बापू मिस्तरी,चेतन पाटील, भुषण पाटील,धिरज कापुरे, चेतन अहिरे,परेश पाटील,संजोग राजपुत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शिरपूर
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी लवकर उठवावी अशा आशयाचे निवेदन येथील शिवसेनेकडून तहसिलदारांना देण्यात आले़
१६ रोजी नायब तहसिलदार गणेश आढारी यांना या संदर्भातले निवेदन देण्यात आले़ निवेदनात म्हटले आहे की,, लॉकडाऊनच्या काळात या जगाचा पोशींदा शेतकरी या जगाचे पोषण करीत होता़ त्याकाळात कवळीमोल भावाने शेतमाल विकावा लागत होता़ शेतकºयांना या आठवड्यात कांद्याला ३ ते ४ हजारापर्यंत भाव मिळत असल्यामुळे शेतकरी राजा सुखावलेला होता़ अशातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारने काद्यांवर निर्यात बंदी लागून शेतकºयांच्या तोंडीशी आलेला घास हिरावून घेतला आहे़ शिवसेनेने यापूर्वी अनेकदा सत्तेत असूनही शेतकºयांच्या ्रहितासाठी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत़ आज देखील केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागलेली निर्यात बंदी लवकारात लवकर उठवावी़ अन्यथा शिवसेना यापुढे तीव्र आंदोलन करेल, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असेही निवेदनात म्हटले आहे़
नायब तहसिलदार गणेश आढारी यांना निवेदन देतांना सेनेचे उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत, तालुका प्रमुख दीपक चोरमले, अत्तर पावरा, शहरप्रमुख मनोज धनगर, योगेश सुर्यवंशी, मुकेश शेवाळे, योगेश ठाकरे, बंटी लांडगे, गोलू मराठे, अनिकेत बोरसे, उमाकांत गुरव आदींच्या स्वाक्षºया आहेत.यावळी शिवसैनिकांनी तहसील कार्यालयाच्या बाहेर निदर्शने देखील केलीत.

Web Title: Congress, Shiv Sena on the streets against the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.