शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व

By admin | Published: June 19, 2017 12:58 PM2017-06-19T12:58:28+5:302017-06-19T12:58:28+5:30

विरोधी गटाला एकच जागा, 3 उमेदवारांना सारखे मतदान, सोडतीनंतर दोघांचे उजळले भाग्य

Congress's undisputed domination in the Shirpur taluka purchase and sale team | शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व

शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व

Next

ऑनलाईन लोकमत

शिरपूर,दि.19- शिरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या अंतिम दिवशी 17 पैकी 4 जागा बिनविरोध झाल्यामुळे उर्वरीत 13 जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. मतदानानंतर काही वेळातच निकाल जाहीर झाला. त्यात  आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिल़े 
आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलला 17 पैकी 16 तर विरोधी परिवर्तन पॅनलला अवघी एक जागा मिळाली़ खरेदी-विक्री संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक झाली़ 
17 जागांसाठी 38 जणांनी अर्ज दाखल केले असल्यामुळे यंदाची निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावाळली होती़ अखेर 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यात इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदार संघात 1 जागेसाठी जयंत पदमाकर देशमुख शिरपूर (241) व मोहन साहेबराव पाटील वनावल (112) यांच्यात लढत झाली. त्यात जयंत देशमुख विजयी झालेत़
व्यक्तीश: मतदार संघात 5 जागांसाठी नंदलाल साहेबराव पाटील वनावल (233), रवींद्र माधवराव पाटील-भटाणे (250), रामराव चैत्राम पाटील हिंगोणी (248), सुधाकर नारायण पाटील भाटपुरा (218), सुरेश आधार पाटील कुवे (225) हे 5 उमेदवार विजयी झाले तर शांताराम काशिराम महाजन, शिरपूर (59) व गोपालसिंह रणजितसिंह राजपूत अजंदे बु़, (71) हे दोघेही विद्यमान संचालक पराभूत झालेत़ 
सहकारी संस्था मतदार संघाच्या 7 जागांसाठी 10 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होत़े त्यात पद्माकर यशवंत देशमुख शिरपूर (35), संतोष शिवलाल परदेशी हिसाळे (41),  प्रकाश भोमा पाटील घोडसगांव (52), मनोहर रामचंद्र पाटील, गिधाडे (46), रमेश शंकर पाटील, जुने भामपूर (35), सुनिल लक्ष्मण पाटील,करवंद (54), शांताराम काशिराम महाजन, शिरपूर (44) हे 7 उमेदवार विजयी झाले तर मोतीलाल आत्माराम पाटील, त:हाडी (18), देवीदास मोतीराम पाटील, शिंगावे (22), प्रकाशसिंह निमडूसिंह सिसोदिया, अजंदे बु़ (35) हे पराभूत झालेत़
या गटात विद्यमान संचालक पद्माकर देशमुख, रमेश पाटील व प्रकाशसिंह सिसोदिया या तिघांना सारखे म्हणजेच 35 मते मिळाल्याने भूमि महेंद्र अग्रवाल या चिमुकलीच्या हस्ते सोडत पध्दतीने 2 चिठ्ठा काढल्यामुळे सिसोदिया पराभूत झालेत़

Web Title: Congress's undisputed domination in the Shirpur taluka purchase and sale team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.