वीज कंपनीविरोधात ग्राहक मंचात जाणार

By admin | Published: February 3, 2017 12:58 AM2017-02-03T00:58:13+5:302017-02-03T00:58:13+5:30

महापालिका : मीटरच्या बिघाडामुळे अधिक बिलाची आकारणी, 6 कोटींची मागणी

Consumer Forum against Power Company | वीज कंपनीविरोधात ग्राहक मंचात जाणार

वीज कंपनीविरोधात ग्राहक मंचात जाणार

Next

धुळे : शहरातील पथदिव्यांपोटी वीज कंपनीकडून मनपाला आकारले जाणारे वीज बिल मीटरच्या बिघाडामुळे अंदाजे आकारण्यात आले होत़े सदरच्या बिलावर 15 टक्के व्याजासह रकमेची मागणी मनपाने केली असून ग्राहक मंचात जाण्याचा इशारा दिला आह़े
शहरात मनपाचे टय़ूबलाईट 3 हजार 300, सोडियम व्हेपर 4 हजार 900, मेटल हलाईड 2 हजार 100, सीएफएल 2 हजार 400 असे एकत्रित 12 हजार 800 पथदिवे असून 35 चौकात 200 ते 400 व्हॅटचे हायमास्ट लावण्यात आले आहेत़ या सर्व पथदिव्यांवर दरमहा 28 लाखांचे वीज बिल भरण्यात येत़े शिवाय त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर दरमहा सरासरी 5 लाख आणि वर्षाला 65 लाखांचा खर्च महापालिकेला करावा लागतो़ पथदिव्यांच्या वीज वापराचे रीडिंग घेण्यासाठी असलेले 29 मीटर 2012 पासून नादुरुस्त होत़े त्यामुळे महावितरण कंपनीकडून 2012 ते 2015 या तीन वर्षाच्या कालावधीत अंदाजे रीडिंग दाखवून वीज बिलाची आकारणी करण्यात आली़ दरम्यान, ही बाब मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महावितरण कंपनीशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला व नादुरुस्त मीटर बदलून देण्याची मागणी केली. अखेर अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा झाल्यानंतर 2015 मध्ये नादुरुस्त मीटर बदलण्यात आल़े
2012 पासून वाढीव वीज बिल
दरम्यान, नादुरुस्त मीटरची दुरुस्ती झाल्यानंतर आलेले वीज बिल व तत्पूर्वी 2012 पासून आलेले वीज बिल यात प्रचंड तफावत आढळून आली़  त्यामुळे 2012 पासून मनपाला वीज बिलाची वाढीव आकारणी झाल्याचे स्पष्ट झाले असून या कालावधीत मनपाला आलेल्या 18 बिलांची रक्कम  प्रत्येकी 79 लाख 81 हजार 948 इतकी असणे अपेक्षित होत़े मात्र सरासरी देयक वीज बिल 1 कोटी 36 लाख 98 हजार 716 वसूल करण्यात आले आह़े त्यामुळे मनपाने 2012 पासून नियमानुसार आकारणी वगळता जास्तीचे भरलेले 84 लाख 16 हजार 768 रुपये व त्यावरील 2012 पासूनचे 15 टक्के व्याज अशीे एकूण 6 कोटी 26 लाख 91 हजार 750 रुपयांची मागणी मनपाने सातत्याने वीज कंपनीकडे केली आह़े दरम्यान, मनपा प्रशासनाने वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना पत्र दिले असून संबंधित रक्कम तत्काळ वर्ग करावी, उचित निर्णय न घेतल्यास ग्राहक मंचात तक्रार करण्यात येईल, असा इशारा दिला आह़े

Web Title: Consumer Forum against Power Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.