दोंडाईचा बाजार समितीत कापसाची खरेदी सुरू
By admin | Published: January 18, 2017 11:48 PM2017-01-18T23:48:58+5:302017-01-18T23:48:58+5:30
शेतक:यांच्या सोयीकरिता दोंडाईचा बाजार समितीने स्वत:च्या आवारातच कापसाची खुली खरेदी सुरू केली आहे.
दोंडाईचा : दोंडाईचातील शेतक:यांना कापूस विकण्यासाठी विशिष्ट जिनिंगवर जावे लागते म्हणून शेतक:यांच्या सोयीकरिता दोंडाईचा बाजार समितीने स्वत:च्या आवारातच कापसाची खुली खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे कोणत्याही परवानाधारक खाजगी व्यापा:यालादेखील येथे कापूस खरेदी करता येणार असल्याची माहिती माहीती दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी दिली आहे.
सभापती पाटील म्हणाले की, अनेक खाजगी व्यापारी शेतक:यांकडून गावोगावी जाऊन कापूस खरेदी करतात, त्यात शेतक:यांचा कापसाचा लिलाल होत नसल्यामुळे त्यांना पाहिजे तसा दर मिळत नाही, याशिवाय ब:याचदा उधारीने कापूस खरेदी करून अनेक काही व्यापा:यांनी शेतक:यांना फसविलेदेखील आहे. त्यामुळे शेतक:यांचा कापसाचादेखील लिलाव व्हावा म्हणून अनेक व्यापारी बाजार समितीत येऊन लिलाव पध्दतीने बाजारभावाप्रमाणे कापूस खरेदी करतील. त्यातून शेतक:यांचादेखील लाभ होणार आहे. थेट बाजार समितीत कापूस खरेदी सुरू करणारी दोंडाईचा बाजार समिती ही धुळे जिल्ह्यातील पहिलीच बाजार समिती आहे.
जागेवरच चेकव्दारे कापसाचे पैसे व्यापारी देतील. याशिवाय व्यापा:यांनादेखील गावोगावी जाऊन कापूस खरेदी करण्याची आवश्यकता नाही, एकाच ठिकाणी पाहिजे तेवढा कापूस खरेदी करून ते या ठिकाणाहून पाहिजे त्या ठिकाणी तो विक्रीसाठी घेऊन जाऊ शकतात, यात परवानाधारक खाजगी व्यापा:यांसह जिनिंगचे मालकदेखील कापूस खरेदी करतील. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, आणि जिनिंगचे संचालक अशा तिन्ही घटकांना लाभ होणार आहे. बाजार समितीलादेखील त्यातून उत्पन्न मिळेल हा हेतू ठेवून राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार ही खरेदी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले .