धुळे जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कपाशीची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:48 AM2019-09-26T11:48:50+5:302019-09-26T11:49:09+5:30

मूग, उडीदचे नुकसान, कपाशीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता

The continuous rainfall in Dhule district has led to the growth of cotton | धुळे जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कपाशीची वाढ खुंटली

धुळे जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कपाशीची वाढ खुंटली

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत
धुळे : यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात खरीपाची पेरणी १०० टक्के झाली आहे. मात्र सतत पडत असलेल्या पावसामुळे त्याचा विपरीत परिणाम खरीपाच्या पिकांवर होऊ लागला आहे. अतिपावसामुळे शेतात वाफ होऊ शकत नाही. त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होऊ लागला आहे. वाफ होत नसल्याने, कपाशीची वाढ काही प्रमाणात खुंटलेली आहे. याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून धुळे जिल्ह्याला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहे. अपेक्षित पाऊस नसल्याने, त्याचा परिणाम खरीपाच्या लागवडीवर होत होता. तीन वर्षात १०० टक्के खरिपाची पेरणीच होऊ शकली नव्हती.
यावर्षी परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. जून महिना वगळता जुलै ते सप्टेंबर दरम्यान सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच खरिपाची १०० टक्के पेरणी झाली.
दमदार पावसामुळे पिकांची वाढही चांगल्या प्रकारे झाली. मात्र सततच्या पाण्यामुळे उडीद-मूगाला काही प्रमाणात फटका बसला आहे.
शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कपाशीची जिल्ह्यात तब्बल २ लाख २४ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. कपाशीच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक नियोजन अवलंबून असते.
पावसामुळे कपाशीची उगवण चांगल्या प्रकारे झालेली आहे. झाडांना फुलही लागली आहे. भाद्रपद महिन्यात कडकं उन्ह पडतात, त्यामुळे पिकांची वाढ चांगल्याप्रकारे होत असते. परंतु यावर्षी भाद्रपदातही दमदार पाऊस होत असून, अभावानेच कडक उन्ह पडते आहे. उन्हाअभावी शेतात वाफ होत नसल्याने, कपाशीची वाढ खुंटू लागली आहे. ऐन कैरी भरण्याच्या कालावधीतच कपाशी पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ लागल्याने, त्याचा फटका उत्पन्नावर बसण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे आता वरूण राजाने विश्रांती घ्यावी व कडक उन्ह पडावे अशी प्रार्थना करण्याची वेळ बळीराजावर येऊन ठेपलेली आहे.
ज्वारी, बाजरीवरही परिणाम
सतत पडणाºया पावसाचा खरीपातील ज्वारी व बाजरी या पिकांवरही काहीसा परिणाम होऊ शकतो.
हा कालावधी बाजरीचे दाणे भरण्याचा आहे. यासाठी कडक उन्हाची गरज आहे. मात्र रोज ढगाळ वातावरण, अधूनमधून पाऊस पडत असल्याने, त्याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होऊ शकतो. अर्थात बाजरी काढणीला अजून १५ ते २० दिवसांचा कालावधी बाकी आहे. येत्या काळात पाऊस थांबला तरी बाजरीचे उत्पन्न चांगले येऊ शकते. तीच स्थिती ज्वारीची देखील आहे.

Web Title: The continuous rainfall in Dhule district has led to the growth of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे