लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 10:18 PM2020-01-05T22:18:31+5:302020-01-05T22:18:52+5:30

शिरपूरात राष्ट्रीय परिषद : प्रभारी कुलगुरू माहुलीकरांचे प्रतिपादन

Control population growth | लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवा

लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवा

Next

शिरपूर : माणसाने सर्वकाळ पर्यावरणाचे भान ठेऊन जगायला पाहिजे. तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकारायचे असेल तर लोकसंख्या वाढीवर नियंत्रण व सार्वजनिक शिस्त आवश्यक असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. पी़ पी़ माहुलीकर यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले़
दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या कर्मवीर दालनात रसायनशास्त्र विभागातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले़ ‘मल्टिडिसीप्लीनरी रिसर्च अँड इनोव्हेशन इन सायन्स अँड टेक्नोलॉजी’ या विषयावर परिषद घेण्यात आली़
यावेळी संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु पी. पी. माहुलीकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता ए. बी. चौधरी, एस़ एस़ राजपूत, भोपाळचे डॉ. नितीन पाटील, बँगलोरचे डॉ. पुरुषोत्तम देवांग, बडोद्याचे डॉ. अमोल चौधरी, बारडोलीचे डॉ. अमृत प्रजापत, डॉ. विकास पाटील, रोहित रंधे, प्राचार्य डॉ़ एस़ एऩ पटेल उपस्थित होते़
राजपूत म्हणाले, तरुण संशोधकांना सुसंधी असल्याचे सांगून ‘मल्टिडिसीप्लीनरी रिसर्च अँड इनोव्हेशन इन सायन्स अँड टेक्नोलॉजी’ या विषयावर मार्गदर्शन केले़ विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता ए.बी.चौधरी, जगासमोर कार्बन उत्सर्जनाचा मोठा प्रश्न उभा आहे. त्यावरील मोनो इथेनॉल अमाईनसारखे उपाय महागडे आहेत. जंगलांची पुनर्निर्मिती वेळखाऊ ठरत आहे़ सौर उर्जेचा वापर आणि सर्व प्रक्रियातून येणारा टाकाऊ कचरा नष्ट करणे हे उपाय केले, तरच मानवाला पृथ्वीवर जगता येईल.
किविप्र संस्थेच्या खजिनदार आशा रंधे यांनी मानवी कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधांचा प्रत्यक्ष उपयोग झाला पाहिजे. संशोधन केवळ कागदावर न राहता आचरणात आले पाहिजे असे प्रतिपादन केले़चर्चासत्रास संपूर्ण भारतातून १०० संशोधक व विद्यार्थी, उपस्थित आहेत़ त्यांच्या शोधनिबंधांचा समावेश असलेले सुव्हेनिअर प्रकाशित करण्यात आले़ तांत्रिक सत्रात नितीन पाटील, डॉ.पुरूषोत्तम देवांग, डॉ . अमोल चौधरी, डॉ़अमृत प्रजापत यांची व्याख्याने झालीत़ यशस्वीतेसाठी उपप्राचार्य दिनेश पाटील, डॉ़एम़व्ही़ पाटील, प्रा.मराठे, प्रा़एस़पी़महिरे, प्रा़विलास महाले, डॉ.शरद पाटील, प्रा. पी.जी.पाटील, प्रा़लखन चौधरी, प्रा़ धीरज सोनवणे, प्रा.संदीप चौधरी, प्रा़ गणेश भामरे, ज्योती पाटील, पूजा सावळे, शालिक तिरमले, संजय निकम यांनी परिश्रम घेतले़ प्रास्तविक प्राचार्य डॉ़एस़एऩ पटेल, सुत्रसंचालन प्रा़स्वाती विहिरे, प्रा.भदाणे तर आभारप्रदर्शन प्रा.महिरे यांनी केले़
आज समारोप
६ रोजी या परिषदेचा समारोप केला जाणार असून मुंबईचे एन.सेकर, बडवाणीचे प्रमोद पंडित, डॉ़आऱआऱ पवार हे मार्गदर्शन करणार आहेत़

Web Title: Control population growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे