जैताणे शिवारातून ६० हजार ३९२ रुपये किमतीची कॉपर केबल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 06:30 PM2023-07-23T18:30:35+5:302023-07-23T18:31:00+5:30

सुरक्षारक्षक जगदीश रमेश जाधव (वय ३०, रा. जैताणे, ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार जैताणे शिवारातून चाेरट्याने ६० हजार ३९२ रुपये किमतीची कॉपर केबल लंपास केली.

Copper cable lampas worth 60 thousand 392 rupees from Jaitane Shiwar | जैताणे शिवारातून ६० हजार ३९२ रुपये किमतीची कॉपर केबल लंपास

जैताणे शिवारातून ६० हजार ३९२ रुपये किमतीची कॉपर केबल लंपास

googlenewsNext

धुळे : साक्री तालुक्यातील जैताणे शिवारातून चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीचे कॉपर केबल लांबविले आहे. याप्रकरणी शनिवारी निजामपूर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

सुरक्षारक्षक जगदीश रमेश जाधव (वय ३०, रा. जैताणे, ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार जैताणे शिवारातून चाेरट्याने ६० हजार ३९२ रुपये किमतीची कॉपर केबल लंपास केली. चोरीची ही घटना ३ मे ते २१ जुलै २०२३ या कालावधीत घडली. घटना लक्षात येताच निजामपूर पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेडकॉन्स्टेबल मोरे घटनेचा तपास करीत आहेत.
 

Web Title: Copper cable lampas worth 60 thousand 392 rupees from Jaitane Shiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.