अर्थशास्त्रात कॉपी, 15 जणांवर कारवाई
By admin | Published: March 15, 2017 11:49 PM2017-03-15T23:49:36+5:302017-03-15T23:49:36+5:30
बारावीची परीक्षा : भरारी पथक
धुळे : इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयात कॉपी करताना बुधवारी 15 जणांना पकडले. ही कारवाई माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या पथकाने केली. आतार्पयत ही सर्वात जास्त विद्याथ्र्यावर कारवाई आहे.
बुधवारी सकाळी 11 ते 2 यावेळेत अर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आठ जणांना कॉपी करताना पकडले. त्यांनी श्रीमती टी.बी.बागल कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, दोंडाईचा या परीक्षा केंद्राला भेट दिली. या केंद्रावर तब्बल 5 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. तसेच दोंडाईचा येथील आर.डी.एम.पी.हायस्कूल या परीक्षा केंद्रावर एक जणाला कॉपी करताना पकडले. शिंदखेडा येथील एम.एच.एस.एस. हायस्कूल परीक्षा केंद्रावर दोघांनी कॉपी करताना पकडले.
याच विषयामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या पथकाने सात जणांना पकडले. या पथकाने संत गाडगे महाराज माध्यमिक विद्यालय थाळनेर या केंद्रावर दोघांना कॉपी करताना पकडले. तसेच थाळनेर येथील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पाच जणांना कॉपी करताना पकडले.
16 मार्च रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत वस्त्रशास्त्र व दुपारी 3 ते 6 यावेळेत मराठी साहित्य हा पेपर होणार आहे. तसेच इयत्ता दहावीचा 16 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत भूमिती विषयाचा पेपर होणार आहे.