जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवसात ९९ रुग्णांची कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 10:01 AM2020-05-02T10:01:20+5:302020-05-02T10:13:30+5:30

८२ एसआरपीएफ बटालियनच्या अधिकारी व जवानांचा समावेश

Corona examination of 99 patients in a single day at District General Hospital | जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवसात ९९ रुग्णांची कोरोना तपासणी

Dhule

Next

धुळे: जिल्हा रुग्णालय धुळे येथे करोना आजारा संबंधी तपासणी २७ एप्रिल पासून सुरू व ५ दिवसातच १४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी मालेगाव येथून कर्तव्य बजावून परत आलेल्या एसआरपीएफ बटालियनच्या ८२ अधिकारी व जवानांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाने असमर्थता दर्शविल्याने त्यांच्यासह एकूण ९९ रुग्णांची कोरोनासाठी तपासणी व स्वबचे नमुने १ मे रोजी जुने जिल्हा रुग्णालय येथे घेण्यात आले. सदरील तपासणी साठी जिल्हा रुग्णालयातील नोडल अधिकारी डॉ.विशाल पाटील ह्यांनी पुढाकार घेऊन या तपासण्या पार पाडल्या, तपासणीसाठी डॉ संजय शिंदे, डॉ स्वप्नील पाटील,डॉ अभय शिनकर, डॉ दिनेश दहिते,डॉ रवी सोनवणे, डॉ अभिषेक पाटील व सिस्टर मोरे, संगीता चव्हाण, सुरेखा निकम, एस्तर कांबळे यांनी प्रयत्न केले. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करोना आजाराची तपासणी डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सोडून दुसऱ्या स्तरावरील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हाधिकारी संजय यादव, सीईओ वानमथी सी यांच्या सूचनेनुसार शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालय येथे तपासणी सुरू करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत

Web Title: Corona examination of 99 patients in a single day at District General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे