कोरोना रूग्ण वाढीचा आलेख घसरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 08:18 PM2020-09-30T20:18:27+5:302020-09-30T20:19:31+5:30
दिलासादायक : दोंडाईचा शहरात आतापर्यंत ८३३ बाधित आढळले, ७५६ जणांची कोरोनावर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखत असतांनाच चाचण्याची संख्या वाढविण्यात आली आहे.त्यामुळे दोडाईचात कोरोना कोरोना संसर्ग बाधिताचा आलेख घसरत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे.सोमवारी तर एकही कोरोना बाधित आढळून आला नाही.
आतापावेतो ८३३ बाधित आढळून आले आहे. त्या पैकी २६ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे ७५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या विविध ठिकाणी ५१ जण कोरोनवर उपचार घेत आहेत.कोरोना बाधित मृत्यू दर ३.१ टक्के झाला आहे,त्या मुळे चिंतेत भर पडली आहे.
आमदार जयकुमार रावल व नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांचा मार्गदर्शनखाली नगरपालिकेने नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. चाचण्या व ट्रेसिगचे प्रमाण वाढले आहे. आठ दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’चाही सकारात्मक परिणाम झाला आहे. माझे कुंटुंब माझी जबाबदारी सर्व्हे सुरू आहे.नागरिकांतही जबाबदारीचे भान वाढले आहे.या सर्वांचा परिणाम म्हणून कोरोना बाधित संख्या घटल्याचे दिसत आहे.
२४ ते २८ सप्टेंबर या पाच दिवसांचा आढावा घेतला तर दिलासादायक चित्र दिसत आहे.या पाच दिवसात वैद्यकीय अधिकारी व स्वॅब घेणाºया पथकाने २३० जणांचे स्वॅब घेतलेत.त्यात २४ रोजी ५१ ,२५ रोजी ४२,२६ रोजी ३६,२७ रोजी ६१ व २८ ला ४० जणांचे स्वॅब घेतले. त्यात अनुक्रमे ७, १५,१०,१४ व २८ रोजी शुन्य असे ४६ रुग्ण कोरोना बाधित आढळलेत.दोंडाईचा शहरात कोरोना रुग्ण घटल्याचे दिसत आहे. मात्र ग्रामीण भागात दुप्पट कोरोना बाधित आढळून आल्याने तेथे उपाययोजना सक्तीने राबविणे गरजेचे दिसत आहे.४६ पैकी १५ दोडाईचात तर निमगुळ, मांडळ,भडणे, रामी, लंघाणे, टाकरखेडा,होळ,तावखेडा,निरगुडी,वरपाडे, शेवाडे,वेदाने,न्याहली या ग्रामीण भागात ३१ कोरोना बाधित आढळून आले आहेत. दोडाईचात सोमवारी एकही कोरोना बाधित आढळून न आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
परंतु नागरिकांनी गाफील राहून चालणार नसून कोरोना वाढुच नये म्हणून नेहमी सतर्क राहून मास्क वापरणे,सोशल डिस्टन्स ठेवणे आदी उपाययोजना कराव्यात.