भाटपुऱ्यात आढळला कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:33 PM2020-05-22T22:33:02+5:302020-05-22T22:33:22+5:30

शिरपूर : एंरडोल येथे विटा पाडण्याच्या कामाला गेले होते, गावात पसरला शुकशुकाट

A coronary patient was found in Bhatpur | भाटपुऱ्यात आढळला कोरोनाबाधित रुग्ण

भाटपुऱ्यात आढळला कोरोनाबाधित रुग्ण

Next

शिरपूर : तालुक्यातील भाटपुरा येथील ४८ वर्षीय इसम कोरोना बाधित आढळून आला़ त्यामुळे आतापर्यंत या तालुक्यात बाधितांची संख्या ९ झाली आहे़
तालुक्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आमोदे येथे ४५ वर्षीय महिला आढळून आली होती़ सदर महिला आईच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे गेली होती़ तिच्या पाठोपाठ तिची ६५ वर्षीय वृध्द आई सुध्दा कोरोना बाधित आढळली होती़ याच गावातील ४५ वर्षीय सेक्युरेटी गार्ड सुध्दा मिळून आला होता़ तिघांनी उपचारानंतर कोरोनावर मात करून मुक्त झालेत़
दरम्यान, अर्थे येथील मूळ निवासी असलेला जवान कोरोना बाधित आढळल्यानंतर त्याची ३८ वर्षाची पत्नी, १४ वर्षाची मुलगी, वृध्द आई व वडील असे चौघे बाधित झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ मात्र त्यांच्या सानिध्यात आलेले ३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत़ तसेच शहरातील सर्वज्ञ नगरातील येथील बस आगारातील ५२ वर्षीय चालक देखील बाधित झाला आहे़ अद्यापही ९ जणांचा अहवाल प्राप्त झालेले नाहीत़ तसेच २२ रोजी देखील २ जणांचे स्वॅब घेण्यात आल्यामुळे असे एकूण ११ जणांचा अहवाल प्रलंबित आहे़
२२ रोजी दुपारनंतर भाटपुरा येथील ४८ वर्षीय इसम कोरोना बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला़ सदर इसम गेल्या काही महिन्यांपासून एरंडोल येथे विट कामासाठी गेला होता़ गेल्या आठवड्यातच तो गावी परतला होता़
बाधित असल्याचे वृत्त कळल्यानंतर लगेच तहसिलदार आबा महाजन, थाळनेर पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन साळुंखे यांनी भाटपुरा गावी जावून गाव सील केले़
रूग्णाच्या घराला केंद्रबिंदू ठरवून ३ किमीच्या परिघातील क्षेत्राला कंटेन्मेंट झोन जाहिर करून गावात संचारबंदी करण्यात आली़ तसेच ३ किमी परिघाबाहेरील २ किमीचा परीसर बफर झोन जाहिर करण्यात आला़ संपूर्ण गावात फवारणी करून निजंर्तुक करण्यात आले़ गावातील नागरीकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक मदत करणार असल्याचे सांगण्यात आले़ परिस्थिती नियंत्रणात असून अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेल्यांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे़ भाटपुरा गावात शुकशुकाट आहे़
बभळाज : रुग्णास उपचारासाठी नेल्यानंतर माहिती मिळाली असून रुग्णाच्या मुलीचे १८ मे रोजी लग्न झाले़ त्यासाठी नवरदेवाकडील १५ पाहुणे भुसावळ येथून आले होते़ १९ तारखेला रुग्णास उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते़ त्याचदिवशी रुग्णांचे स्वॅब पाठविण्यात आले होते़ सदर लग्नाबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे़

Web Title: A coronary patient was found in Bhatpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे