Coronavirus : धुळ्यात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 09:36 PM2020-04-10T21:36:39+5:302020-04-10T21:41:35+5:30
Coronavirus : कोरोना तपासणी अहवाल आज मिळाला झाला असून तो पॉझिटीव्ह आला आहे. हा धुळे जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धुळ्यात पहिला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडला आहे. साक्री येथील कोरोना संशयित 53 वर्षीय व्यक्तीला 8 एप्रिल रोजी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. परंतु त्यांचा आज 1.30 वाजता मृत्यू झाला आहे. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल आज मिळाला झाला असून तो पॉझिटीव्ह आला आहे. हा धुळे जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आहे.
मालेगाव येथील एक महिला रुग्ण 9 एप्रिल रोजी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलगीकरण कक्षात दाखल असून तिचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे असे आर. आय. सुर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल अधिकारी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय यांनी सांगितले.
Coronavirus : कोरोनाचा धसका! 'या' राज्याने घेतला 1 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णयhttps://t.co/p1HJw7E0yu#coronaupdatesindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 10, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाचा धसका! 'या' राज्याने घेतला 1 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय
Coronavirus : अनोखा आदर्श! ...अन् त्याने झाडावरच बांधलं घर, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमुळे धान्य विकण्यात अडचण, शेतकऱ्याची आत्महत्या
Coronavirus : दिलासादायक! भारतातील तब्बल 400 जिल्हे कोरोनामुक्त
Coronavirus : ...म्हणून 'या' देशाने थांबवला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर